पुणे : सांस्कृतिक शहर म्हणून पुणे जिल्ह्याची ओळख आहे. पण गेल्या काही दिवसांपासून शहरात वाढत चालेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे पुणे हा गुन्हेगारांचा अड्डा बनत चालला आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अशाच ऐन दिवाळीच्या सण उत्सवाच्या काळात एका नामांकित पबमध्ये पत्याचा डाव रंगला. या पबला बंदी होती, पण तरीही अवैधरित्या या पबमध्ये जुगार रंगला होता.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोरेगाव आयटी पार्क परिसरात ही घटना घडली. या भागात एक नामांकित पबमध्ये पत्त्यांचा डाव रंगला होता. या पबमध्ये बंदी असताना देखील जुगार रंगला होता. लोक एकीकडे दिवाळीचं लक्ष्मीपूजन करत होते. तर दुसरीकडे, या पबमध्ये दिवाळी पार्टीमध्ये पोकर खेळण्यात आला होता. दिवाळी पार्टीमध्ये कायद्याने बंदी असलेला जुगार खेळण्यात आला.
कसिनो प्रमाणे डाव जमवला होता. यासाठी मोठ्या प्रमाणात जुगार खेळणाऱ्यांनी गर्दी केली. पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये असणाऱ्या पब मध्ये अनेकजण जुगार खेळतानाचे व्हिडिओ आता समोर आले आहे. या पबमधील व्हिडीओ व्हायरल झाले आहे. या घटनेमुळे पुण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेकडे मात्र पुणे पोलिसांचं दुर्लक्ष असल्याचं समोर आलं आहे.
