काय म्हटले आहे परिपत्रकात?
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पुणे शहर पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्यास विरोध केला. मुळात हे त्यांचे वैव्यक्तिक मत आहे. ही काही कार्यकारीणी किंवा
पक्षाचे पदाधिकारी यांना मिटींग घेवून विचारणा किंवा ठराव केलेला नाही. त्यांचे विधान म्हणजे पक्षाला खिंडीत पकडण्याचे आहे. पण पक्षा पेक्षा कोणी मोठा नसतो. आपलेस्वतःचे अस्तित्व नष्ट होणार ह्या भितीने केलेले हे बालीशपणाचे विधान आहे. एकतर त्यांनी स्वतःचा राजीनामा देवून पक्षातून बाहेर पडावे अथवा हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारावा.
advertisement
प्रशांत जगताप काय म्हणाले?
तर यावर उत्तर देताना प्रशांत जगताप यांनी ज्यांनी पत्र काढले त्यांनी बोलले पाहिजे. हा पक्ष आणि माविआला जन्म शरद पवार यांनी दिली आहे. त्यामुळे साहेबांशी बोललो आहे,आमची एक बैठक झाली. त्यात आपण महाविकासआघाडीसोबत सोबत जावी अशी आहे,त्यामुळे चर्चा झाली आहे. प्रक्रिया बाहेरील कार्यकर्ते यांनी बोलले असेल तर यात जास्त काही बोलावे असे वाटत नाही,आमच्यात कोणी नाराज नाही,आमची बैठक झाली.दोन राष्ट्रवादी एकत्रित लढण्यावर आमची चर्चा कधीही झाली नाही नव्हती.
