TRENDING:

पुण्याची प्रियांका झाली मलेशियातील सर्वोत्कृष्ट इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट, नेमका कसा झाला हा प्रवास?, VIDEO

Last Updated:

प्रियांकाने 2018 पासून विविध मुलींना प्रशिक्षण दिले आणि आज त्या मुली स्वतःचा व्यवसाय देखील करत आहेत. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
advertisement

पुणे : सौंदर्याला जेव्हा बुद्धिमत्तेचा शृंगार होतो, तेव्हा तर खऱ्या अर्थाने अस्सल स्त्री तेजाचा सन्मान होतो, असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय पुण्यातील प्रियांका मोरे या तरुणीकडे पाहून येतो. कॉम्प्युटर इंजिनियरिंग करून एखाद्या कंपनीत काम सुरू न करता स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याच्या धडपडीतून प्रियांका आज इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट झाली आहे.

मूळची खान्देशातील असलेली प्रियांका लग्नानंतर पुण्यात स्थायिक झाली आहे. प्रियांका हिला मलेशियातील सर्वोत्कृष्ट इंटरनॅशन मेकअप आर्टिस्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मलेशियातील इरवी इखसान यांच्या हस्ते इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट या पुरस्काराने प्रियांका हिचा सन्मान करण्यात आला.

advertisement

पावसाळा आणि Viral Infection, अशी घ्या आपल्या आरोग्याची काळजी, महत्त्वाच्या टिप्स

त्याठिकाणी 8 दिवसीय प्रशिक्षण दिले गेले आणि यातून नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, असे ती म्हणाली. पुण्यात प्रियांकाने प्रियाज सलून अँड अकॅडमीची सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातुन अनेक मुली तिच्याकडे शिकायला येतात.

प्रियांकाने 2018 पासून विविध मुलींना प्रशिक्षण दिले आणि आज त्या मुली स्वतःचा व्यवसाय देखील करत आहेत. मुलींनी पुढे येत आपल्याला आवडणाऱ्या क्षेत्रात आपल्या पायावर उभे राहायला पाहिजे, अशी भावना प्रियांका यांनी व्यक्त केली.

advertisement

गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा, या तारखेपासून सुरू होणार फेरीबोट सेवा

सध्या मुली मेकअप यां क्षेत्रात करियर करण्यास उत्सुक असतात. या मुलींसाठी प्रियांका नक्कीच आदर्श ठरू शकते. एका सर्वसामान्य घरातील मुलगी ते मिसेस इंडिया नक्षत्र 2022 आणि आता इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट प्रियांकाचा हा प्रवास तिच्यासाठी अजिबात सोपा नव्हता. पण तिने खडतर प्रवास करत तिचे स्वप्न पूर्ण केले. तिच्या या यशासाठी अनेक स्तरावर तीचे कौतुक होत आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
पुण्याची प्रियांका झाली मलेशियातील सर्वोत्कृष्ट इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट, नेमका कसा झाला हा प्रवास?, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल