पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून शिवकालीन युद्ध कला ही पुढे आलेली आहे. हीच शिवकालीन युद्धकला असलेल्या मर्दानी खेळ जोपासण्याचा प्रयत्न पुण्यातील आदित्य केंजळे हा तरुण करत आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो केळेवाडी आणि आयडियल कॉलनी परिसरात असलेल्या वस्तीतील, झोपडपट्टीतील मुलांना मोफत प्रशिक्षण देतोय. त्याच्याकडे सध्या किमान 60 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
advertisement
कशी झाली सुरुवात?
श्री सद्गुरू कला क्रीडा मध्ये गेली दोन वर्ष झालं मी लाठी काठी शिकवत आहे. परंतु मी 2012 पासून ही कला शिकतो आहे. मर्दानी खेळ म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात चालू झालेली युद्ध कला आहे. ज्याद्वारे आपण स्वराज्य स्थापन केले आणि शत्रूला मात देऊ शकतो. अशी युद्ध कला मी मुलांना शिकवत आहे. प्रत्येक मुलींना, स्त्रियांना स्वरक्षणाची गरज असते आणि माझ्याकडे सर्वात जास्त मुली शिकतात, असे आदित्य सांगतो.
शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रांचा संग्रह, वाघनखांचे हे प्रकार पाहिलेत का?
मर्दानी खेळाचं प्रशिक्षण
मर्दानी खेळात शिकवली जाणारी पाहिली गोष्ट म्हणजे लाठी काठी होय. ही कुठं ही उपलब्ध होऊ शकते. त्यापासून तुम्ही स्वतःच रक्षण करायचं आहे. त्याच प्रमाणे तलवार चालवणे हे अतिशय चपळतेचं काम आहे. तर दाणपट्ट्याचं पातं लवचिक असतं आणि दोन्ही बाजूने धार असते. त्याच प्रमाणे भाल्याद्वारे ही आपण डिफेन्स करू शकतो.
महाराष्ट्रातील हा दुर्गम किल्ला पाहिलात का?, शिवकाळात इथं ठेवले जात कैदी, Video
आताच्या काळात सर्वांनी स्वसंरक्षणासाठी ही कला शिकणं गरजेचं आहे. मी खूप गरिबीच्या परिस्थितीतून येऊन हे शिकलो आहे. त्यामुळे इथे शिकणाऱ्या प्रत्येक मुलीला मी ते सांगत असतो. वस्ती भागात हे खेळ शिकवतो.ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशा मुलींना प्रशिक्षण देण्याचं काम मी करतो आहे, अशी माहिती मर्दानी खेळ प्रशिक्षक आदित्य केंजळे यांनी दिली आहे.





