महाराष्ट्रातील हा दुर्गम किल्ला पाहिलात का?, शिवकाळात इथं ठेवले जात कैदी, Video
- Published by:Aaditi Datar
Last Updated:
छत्रपती शिवरायांनी कैद्यांना ठेवलेला दुर्गम किल्ला पाहण्यासाठी आणि ट्रेकिंगसाठी महाराष्ट्रातून पर्यटक या ठिकाणी येतात.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा: महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला समृद्ध निसर्ग आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळे पर्यटकांना भुरळ घालत असतात. पण साहसी ट्रेक म्हटलं की सर्वांना वासोटा किल्ल्याची आठवण होते. जावळीचं घनदाट जंगल आणि झाडा-झुडपातून, पाण्यातून जाणाऱ्या मार्गामुळे हा ट्रेक संस्मरणीय असाच होतो.
शिवकाळात किल्ल्यावर कैदी
वासोटा किल्ला पाहण्यासाठी महाराष्ट्रभरातून पर्यटक येत असतात. या किल्ल्याच्या इतिहासातही महत्त्वाच्या नोंदी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी वासोटा किल्ल्याचं नाव व्याघ्रगड असं ठेवलं होतं. शिवकाळात या गडाचा वापर कैदी ठेवण्यासाठी केला जात असे. कालांतराने याचं नाव वासोटा पडलं असावं असं सांगितलं जातं.
advertisement
कसा आहे मार्ग?
वासोटा किल्ल्याचा प्रवास जवळपास अडीच ते तीन तासांचा आहे. ट्रेकर्सचे पाय कितीही थकले तरी येथील निसर्ग निराश करत नाही. त्यामुळे ट्रेकर्सना खुणावणारा आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येईल असा वासोटा किल्ला अनेकांचे आकर्षण केंद्र ठरतेय. वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी बामणोली इथून बोटीतून प्रवास करावा लागतो. कोयना धरणाच्या बॅक वॉटरमधून बोटिंग करत जाताना अत्यंत सुंदर निसर्ग पाहायला मिळतो. बोटिंगनंतर किल्ल्याच्या दिशेने पायी प्रवास करावा लागतो.
advertisement
किल्ल्यावर जाण्यासाठी पहिलं शिवसागर तलाव बोटीने पार करावा लागतो. तिथून वनखात्याच्या चेकपोस्टपासून वर चढाई करत दोन ते तीन तासांनी तुम्ही वासोट्याच्या माथ्यावर पोहोचता. हा संपूर्ण प्रवास घनदाट जंगलाने वेढलेला आहे. यामध्ये काही प्रमाणावर जंगली प्राण्यांचे ही दर्शन होते.
advertisement
किल्ल्यावर पोचताच समोर मारुतीरायाचे दर्शन होते. किल्ला आणि त्यावरून कोयना आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या विलोभनीय दृश्याने दोन-अडीच तास केलेल्या पायपिटीचा थकवा संपूर्ण निघून जातो. वासोटा किल्ल्याच्या जवळ नागेश्वर नावाचे गुहेतले शिवमंदिर आहे. ते बघून एका दिवसात पुन्हा वासोटा गडावर परतावे लागते किंवा तिथून खाली कोकणात उतरता येते. वासोटा किल्ल्यावर मुक्कामाची परवानगी नसल्याने एका दिवसात हा ट्रेक करावा लागतो.
advertisement
गडावर जाताना काय काळजी घ्यावी?
वासोट्याला जाण्यासाठी साताऱ्याहून कास पठार मार्गे बामनोली गावात जायचे. मुंबई पुण्यावरून निघत असाल तर शक्यतो रात्रीचा प्रवास करावा. सकाळी बामणोलीत पोहोचून दिवसभर वासोटा पाहायचा आणि संध्याकाळी परतीचा प्रवास करता येऊ शकतो. गडावर जात असताना आपल्या जेवणाची सोय करावी. गडावर जेवणाची सोय नाही. पर्यायी बामणोली मधून जेवणाचे डबे घेऊन जावे. गडावर जात असताना प्लास्टिक पिशव्या, बाटल्या घेऊन जात असाल तर गडावरून उतरताना जबाबदारीने प्लास्टिकच्या वस्तू गडाच्या खाली घेऊन येणे. अन्यथा वनविभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते.
Location :
First Published :
January 28, 2024 1:13 PM IST
मराठी बातम्या/Travel/
महाराष्ट्रातील हा दुर्गम किल्ला पाहिलात का?, शिवकाळात इथं ठेवले जात कैदी, Video