पुणे - महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीची त्सुनामी आली आहे. महाराष्ट्रात भाजपने लागोपाठ तिसऱ्यांदा तीन आकडी संख्या गाठली आहे. 124 जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर शिवसेना 55 जागांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस 37 जागांवर आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे 20 जागांवर, काँग्रेस 19 जागांवर आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 13 जागांवर आघाडीवर आहे. तर 20 जागांवर इतर पक्ष आणि अपक्ष आघाडीवर आहेत.
advertisement
पुण्यातही धंगेकरांना धक्का बसला आहे. कसब्यातून हेमंत रासनेंची विजयाच्या दिशेने वाटचाल झाली आहे. यानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष होत आहे. पुण्यातील मुख्य लढत समजल्या जाणाऱ्या कसबा मतदारसंघातून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे हेमंत रासने त्यांच्यात मोठी लढत झाली. दुसऱ्या फेरीनंतर हेमंत रासने यांनी आघाडी घेतलेली पाहायला मिळत असून 11 व्या फेरीनंतर 17500 मतांनी आघाडीवर असलेले पाहायला मिळत आहे.
त्यामुळे त्यांनी विजयाकडे वाटचाल केल्याचे दिसून येत असून हा धंगकरांना मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, पुण्यातील एकूण आठही मतदार संघातून भाजपचे उमेदवार हे आघाडीवर आहेत. त्यामुळेच कार्यकर्त्यां मध्ये मोठा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळत असून डीजे साउंड, घोषणा देत विजयी आमदार असे पोस्टरही कार्यकर्त्यांनी लावले आहेत.
गृहप्रवेश करण्याआधी लक्षात ठेवा या गोष्टी, अन्यथा पैसे खर्चूनही होईल नुकसान
सतेज पाटलांच्या पुतण्याचा पराभव -
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. दुपारी 12.30 वाजेपर्यंत 221 जागांवर महायुती तर फक्त 56 जागांवर महाविकास आघाडी पुढे आहे. विधानसभा निवडणुकीतला सगळ्यात धक्कादायक निकाल कोल्हापुरातून आला आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांना पराभवाचा धक्का बसला आहे. भाजपच्या अमल महाडिक यांनी ऋतुराज पाटलांना धोबीपछाड दिली आहे.