गृहप्रवेश करण्याआधी लक्षात ठेवा या गोष्टी, अन्यथा पैसे खर्चूनही होईल नुकसान
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
gruhpravesh upay - अनेकजण केव्हाही गृहप्रवेश करत असल्याने ते अशुभ असते. यामुळे घरात वास्तू दोषही लागू शकतो. तसेच जर तुम्हीही येणाऱ्या काळात गृहप्रवेश करत असाल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. अशावेळी नेमकं कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, हे जाणून घेऊयात.
परमजीत कुमार, प्रतिनिधी
देवघर - आपले एक सुंदर, प्रशस्त असे घर असावे, असे सर्वांचे स्वप्न असते. त्यामुळे आपल्या आयुष्याची सर्व कमाई व्यक्ती आपल्या घरासाठी खर्च करतो. मात्र, घर तयार झाल्यावर गृहप्रवेश करताना व्यक्ती लहान लहान गोष्टींची काळजी घेत नाही. इतर मंगलकार्य करण्यासाठी शुभ तिथी आणि शुभ मुहूर्त पाहिला जातो. त्यामुळे चांगले फळ मिळते. पण अनेकजण केव्हाही गृहप्रवेश करत असल्याने ते अशुभ असते. यामुळे घरात वास्तू दोषही लागू शकतो. तसेच जर तुम्हीही येणाऱ्या काळात गृहप्रवेश करत असाल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. अशावेळी नेमकं कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, हे जाणून घेऊयात.
advertisement
देवघरचे ज्योतिषाचार्य पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, मंगलकार्यांची सुरुवात कार्तिकी एकादशीपासून झाली आहे. सर्वप्रकारच्या मंगलकार्यात गृहप्रवेशसुद्धा एक महत्त्वाचे मंगलकार्य आहे. सनातन धर्मानुसार कोणतेही मंगलकार्य हे शुभ तिथी आणि मुहूर्तावरच संपन्न करावे. तेव्हाच चांगले फळ मिळते.
advertisement
गृह प्रवेश करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी -
- गृहप्रवेश नेहमी शुभ तिथीला आणि शुभ मुहूर्तावर करावा. तरच चांगले फळ मिळते.
- हिंदू मान्यतेनुसार शनिवार, मंगळवार आणि रविवारी नवीन घरात प्रवेश करू नये. यामुळे वास्तुदोषही होऊ शकतो.
- भगवान गणेश विघ्न दूर करणारा आणि संकट दूर करणारा असल्याने घरात प्रवेश करताना सर्वात आधी श्रीगणेशाची पूजा करावी. घरात येणारे सर्व प्रकारचे संकटही ते दूर करतात.
advertisement
- नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी घरी पूजा, हवन नक्की करावे. तसेच शंख वाजवूनच नवीन घरात प्रवेश करावा. शंख न वाजवता घरात प्रवेश केल्याने घरात नकारात्मक शक्ती वाढू शकते.
- महिन्यातील प्रतिपदा तिथीला चुकूनही घरात प्रवेश करू नये. असे केल्याने अशुभ परिणाम होऊ शकतात, असे सांगितले जाते.
सूचना - या बातमीत दिलेली माहिती ही पूजारी, ज्योतिषाचार्यांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. कोणताही वैयक्तिक सल्ला नाही. तसेच याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.
Location :
Jharkhand
First Published :
November 23, 2024 12:50 PM IST