कोंढवा प्रभाग 19 मध्ये भाजपसाठी 'कठीण मैदान' मानलं जातं, तिथून एका उच्चशिक्षित तरुणीला संधी देऊन भाजपने एक वेगळी चाल खेळल्याचं दिसत आलं. मात्र, भाजपला याठिकाणी धक्का बसल्याचं पहायला मिळालं. काँग्रेसच्या तस्लीम हसन शेख यांनी विजय मिळवत भाजपला धक्का दिला. मुस्लीम बहुसंख्य असलेल्या या प्रभागात भाजपला काँग्रेसचा गड जिंकता आला नाही.
advertisement
महाराष्ट्रात मुस्लिमांची संख्या 11 ते 12 टक्के असूनही भाजपने या निवडणुकीत मोजक्याच मुस्लिम उमेदवारांना संधी दिली आहे. पुण्यातून 1, नागपुरातून 1 आणि मालेगाव-ठाण्यातून काही मोजके उमेदवार रिंगणात होते. नूर यांचे वडील हुसैन खान गेल्या दीड दशकाहून अधिक काळ कोंढव्यातील स्थानिक प्रश्नांवर काम करत आहेत. "केवळ सत्तेच्या जवळ राहूनच प्रभागाचा विकास आणि निधी मिळवणं शक्य आहे, म्हणूनच नूरने भाजपची निवड केली," असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. नूर फातिमा यांचं राजकारणात येणं हे केवळ योगायोग नाही. बी.कॉम मध्ये विद्यापीठात प्रथम येणाऱ्या नूर यांचा भर 'आयडेंटी पॉलिटिक्स' ऐवजी विकासाच्या मुद्द्यांवर आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या निकालानंतर प्रभाग 19 मध्ये संमिश्र यश पहायला मिळालं आहे. काँग्रेसच्या तस्लिम हसन शेख, आसीया मणियार आणि काशिफ सय्यद यांनी आपापल्या जागांवर विजय मिळवून काँग्रेसचा गड राखण्यात यश मिळवले आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते गफूर पठाण यांनीही आपला करिश्मा कायम ठेवत विजय खेचून आणला आहे. या विजयामुळे कोंढवा परिसरात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे.
