गुन्हा दाखल होण्याची शक्यता
कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे. बनावट पासपोर्ट (Passport) बनवल्याच्या गंभीर प्रकरणी त्याच्यावर पुण्यात लवकरच अजून एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. पुणे पोलीस आता घायवळवर कोथरूड पोलीस ठाण्यात अजून एक गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत. पासपोर्ट (Passport) मिळवण्यासाठी त्याने खोटी कागदपत्रे आणि खोटी माहिती दिल्याप्रकरणी पुणे पोलीस त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहेत.
advertisement
बनावट पासपोर्ट कसा बनवला?
बनावट पासपोर्ट (Passport) बनवल्याच्या या प्रकरणी पुणे पोलिसांनी काल, गुरुवारी अहिल्यानगर येथे तीन ठिकाणी छापेमारी केली होती. या छापेमारीनंतर या प्रकरणातील अनेक गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे. निलेश घायवळने बनावट पासपोर्ट कसा बनवला, या संदर्भात पुणे पोलिसांनी पासपोर्ट ऑफिसशी पत्रव्यवहार केला होता. या पत्राचे उत्तर पोलीस प्रशासनाला मिळाले आहे. या उत्तरामुळेच पोलीस घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत.
मदत करणाऱ्यांवरही कठोर कारवाई
बनावट पासपोर्ट बनवण्यासाठी घायवळला मदत करणाऱ्यांवरही पोलीस कठोर कारवाई करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणात निलेश घायवळला मदत करणाऱ्या लोकांची नावे उघड झाली आहेत का, हे जाणून घेण्यासाठी पोलीस पुढील तपास कसा करत आहेत.