जिलेटिन कांड्या सापडल्या?
सफाई कर्मचारी नेहमीप्रमाणे आपले काम करत असताना त्यांना मोकळ्या प्लॉटलगत एका पोत्यात काही वस्तू दिसल्या. बॉम्बमध्ये वापरल्या जाणाऱ्या जिलेटिन कांड्या आणि वायरसारखे हे साहित्य असल्याने त्यांनी जराही वेळ न घालवता पोलिसांना बोलावले. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिसराची नाकाबंदी केली.
विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
advertisement
या प्रकरणी दोन मजुरांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिलेटिन कांड्या बेकायदेशीरपणे जवळ बाळगल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
साहित्य नेमकं कशासाठी वापरलं?
पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर हे साहित्य नेमके कशासाठी वापरले जात होते, याचा खुलासा झाला. प्राथमिक माहितीनुसार, हे जिलेटिन खडक फोडण्यासाठी वापरले जात होते आणि ते बांधकाम करणाऱ्या मजुरांकडे आढळून आले. पण पोलिसांनी इतर अँगलने देखील चौकशी सुरू केली आहे.
161 जिलेटिनच्या कांड्या जप्त
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी उत्तराखंड पोलिसांनी अल्मोरा येथील एका सरकारी शाळेच्या परिसरातून 161 जिलेटिनच्या कांड्या जप्त करण्यात आल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात शक्तिशाली स्फोटके आढळून आल्याने खळबळ उडाली असून परिसरात सुरक्षा कडक करण्यात आली होती.
