नेमकी घटना काय?
मयत महिलेचं नाव कुसुम वसंत पवार (वय ३२) असून, आरोपी पती दत्ता काळुराम जगताप (वय ३०, रा. बेबडओहळ) याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुसुम यांच्या पहिल्या पतीच्या निधनानंतर त्या दत्तासोबत पत्नी म्हणून राहत होत्या. हे दोघंही भंगार जमा करणं आणि मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करत होते. शनिवारी (१७ जानेवारी) जमा केलेल्या भंगाराच्या पैशांच्या हिशोबावरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं.
advertisement
पुण्यात पुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्ह? येरवड्यात भरधाव कारचा थरार, दुकानात घुसली कार Video समोर
भांडण विकोपाला गेल्यावर दत्तानं कुसुम यांना अश्लील शिवीगाळ करत काठीने त्यांच्या डोक्यावर, मानेवर आणि पोटावर सपासप वार केले. मारहाणीमुळे कुसुम जमिनीवर कोसळल्या. त्यानंतरही क्रूरतेचा कळस गाठत दत्ताने जड दगड उचलून त्यांच्या डोक्यात घातला, ज्यामध्ये कुसुम यांचा जागीच मृत्यू झाला.
मध्यस्थी करणाऱ्यावरही हल्ला: हे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादी महिलेवरही दत्ताने काठीनं हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादीच्या हाताची बोटं फॅक्चर झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच बावधन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतलं. ऐन तिशीत असलेल्या तीन मुलांच्या आईची अशा प्रकारे हत्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
