पोलिसांनी पती सागर चंद्रकांत शेडगे, सासू कमल शेडगे, सासरे चंद्रकांत शेडगे (सर्व रा. स्वामीकृपा बिल्डिंग, आंबेगाव पठार) आणि नणंद सारिका हर्षल वाल्हेकर (वय ३३, रा. कात्रज) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. पीडित महिलेच्या भावाने यासंदर्भात फिर्याद दिली.
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी सिंहगड किल्ला पर्यटनासाठी बंद, काय आहे कारण?
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा विवाह पाच वर्षांपूर्वी सागर शेडगे याच्याशी झाला होता. संसाराचे काही दिवस सुरळीत गेल्यानंतर सासरच्या मंडळींनी क्षुल्लक कारणावरून तिचा छळ सुरू केला. "लग्नात मानपान केला नाही" आणि "हुंड्यात हव्या तशा वस्तू मिळाल्या नाहीत" असे टोमणे मारून तिला मानसिक त्रास दिला जात असे. इतकेच नव्हे तर, पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शारीरिक आणि मानसिकरीत्या छळले. सासरच्या या सततच्या त्रासामुळे आणि त्रासाची परिसीमा गाठल्यामुळे अखेर या विवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.
भारती विद्यापीठ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, कौटुंबिक हिंसाचार आणि हुंडाबळीच्या अनुषंगाने आरोपींची चौकशी केली जात आहे. पाच वर्षांच्या सुखी संसाराचे स्वप्न अशा प्रकारे सासरच्या छळामुळे भंगल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
