पुण्यातील गुन्हे शाखेच्या पथकाला मसाज पार्लरबाबत गुप्त माहिती मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत संबंधित मसाज पार्लरवर छापा टाकला. या कारवाईदरम्यान व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असून तीन तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची सुटका करण्यात आली आहे.
advertisement
मसाज पार्लरच्या नावाखाली...
हडपसर येथील वर्दळीचं ठिकाण असणाऱ्या गाडीतळ परिसरात हा अवैध प्रकार सुरू होता. हडपसर येथील लक्ष्मीमाता मंदिराजवळील व्हाईट पर्ल स्पा या मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंध कक्षाच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहकाचा उपयोग करून खातरजमा करत या स्पा मसाज पार्लरवर छापा टाकण्यात आला. यात पार्लरचा व्यवस्थापक सौरभ इंगळे याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांचे आवाहन...
मिळालेल्या माहितीनुसार, इंगळे यांनी तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले होते. वर्दळीच्या ठिकाणी सुरू झालेल्या या अवैध प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा कुठल्याही गैरप्रकाराची माहिती आढळल्यास नागरिकांनी ताबडतोब पोलिसांना कळवावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, ही कारवाई गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, आणि सहायक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छगन कापसे, उपनिरीक्षक विशाल चव्हाण, तुषार भिवरकर व दताराम जाधव यांनी केली.






