नेमकी फसवणूक कशी झाली?
ताथवडे येथील नितेश विनोदकुमार खंडेलवाल (वय ३६) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत सायबर भामट्यांनी फेसबुकवर एक जाहिरात दिली होती. यामध्ये "शेअर ट्रेडिंगमध्ये दररोज ५ ते १५ टक्के खात्रीशीर नफा मिळेल," असे आमिष दाखवण्यात आले होते. नितेश यांनी या जाहिरातीवर विश्वास ठेवला, त्यानंतर आरोपींनी त्यांना व्हॉट्सॲप आणि फोनद्वारे संपर्कात ठेवून एका बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर नोंदणी करायला लावली.
advertisement
नफा मिळवण्यासाठी 'टॅक्स'चे आमिष: सुरुवातीला नितेश यांना त्यांच्या बनावट खात्यावर मोठा नफा दिसत होता. हा आभासी नफा पाहून नितेश यांनी वेळोवेळी विविध बँक खात्यांवर एकूण ६६ लाख ८७ हजार रुपये जमा केले. मात्र, जेव्हा त्यांनी स्वतःची मूळ रक्कम आणि मिळालेला नफा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी त्यांना आणखी एक अट घातली. "नफ्याची रक्कम काढायची असेल, तर १५ टक्के इन्कम टॅक्स भरावा लागेल," असे सांगून पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली.
आरोपींनी पैसे परत न देता संपर्क तोडल्याने आपली फसवणूक झाल्याचे नितेश यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणातील बँक खात्यांचा आणि मोबाइल नंबरचा तांत्रिक तपास सुरू केला आहे.
