Tilache Ladoo Recipe : मकर संक्रांतीला पाक बिघडण्याचं टेन्शन नकोच, मग बनवा बिना पाकाचे स्वादिष्ट लाडू, रेसिपीचा Video
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
अवघ्या काही दिवसांवर मकर संक्रांतीचा सण आला आहे. आता मकर संक्रांती म्हटलं की अनेकांच्या घरी तिळाचे लाडू हमखास बनवले जातात.
पुणे: अवघ्या काही दिवसांवर मकर संक्रांतीचा सण आला आहे. आता मकर संक्रांती म्हटलं की अनेकांच्या घरी तिळाचे लाडू हमखास बनवले जातात. परंतु अनेक गृहिणींना तिळाचे लाडू बनवण्याचं टेन्शन येतं. कारण प्रमाण थोडं कमी किंवा जास्त झालं की पाक लगेच बिघडतो आणि लाडू तयार होत नाहीत. त्यामुळे आज आपण बिनपाकाचे तिळाचे लाडू बनवणार आहोत. हे लाडू कमी वेळात बनतात आणि चवीला देखील स्वादिष्ट असतात. ही रेसिपी वसुंधरा पाटुकले यांनी बनवून दाखवली आहे.
तिळाचे लाडू बनवण्यासाठी साहित्य
तिळाचे लाडू बनवण्यासाठी अगदी मोजकं साहित्य लागतं. कमी साहित्यात बनणारा हा पदार्थ आहे. यासाठी तुम्हाला तीळ, गूळ, तूप हे साहित्य लागणार आहे.
तिळाचे लाडू बनवण्यासाठी कृती
सुरुवातीला 1 वाटी तीळ मंद आचेवर चांगले भाजून घ्या. तीळ भाजून झाल्यानंतर ते एका कॉटन कापडावर पसरवून पूर्णपणे थंड करून घ्या. तीळ गार झाल्यावर त्यातील 2 टेबलस्पून तीळ बाजूला काढून ठेवावेत. उरलेले तीळ मिक्सरमध्ये घालून थोडे बारीक करून घ्यावेत.
advertisement
त्यामध्ये 1 वाटी चिरलेला गूळ घालून तीळ आणि गूळ नीट मिसळून घ्या. हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून हाताने छान मिक्स करून घ्यावे. त्यानंतर 1 टेबलस्पून साजूक तूप घालून पुन्हा मिक्स करा. लाडू तयार करण्यासाठी लागणारी योग्य बांधणी झाल्यानंतर बाजूला ठेवलेले तीळ या मिश्रणात घालून चांगले मिसळून घ्यावेत. तयार मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे करून लाडू तयार करा. हे लाडू बनवायला अगदी सोपे आणि खाण्यासाठी अतिशय स्वादिष्ट असतात.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 5:12 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Tilache Ladoo Recipe : मकर संक्रांतीला पाक बिघडण्याचं टेन्शन नकोच, मग बनवा बिना पाकाचे स्वादिष्ट लाडू, रेसिपीचा Video










