आवाज येतो पण लाईट लागत नाही
पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यात अनेक ठिकाणी मतदानाची सुरवातच बंद मशीनने झाली, तर अनेक ठिकाणी EVM वरील वेळ सुमारे 15 मिनिटे उशिराची दाखवली जातेय, काही ठिकाणी तिसऱ्या उमेदवाराला मत दिल्याचं बटन दाबल्यानंतर लाईट लागते, काही ठिकाणी शेवटचं (चौथं) बटन दाबल्यानंतर आवाज येतो पण लाईट लागत नाही. एकूणच हे सगळंच संशयास्पद आणि निवडणुकीबाबत अविश्वास निर्माण करणारं आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
advertisement
राज्याच्या वनमंत्र्यांचं नाव गायब
निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टीकरण देऊन हा गोंधळ तातडीने दूर करावा आणि मतदान हे मुक्त आणि निर्भय वातावरणासह मत दिलेल्या उमेदवारांनाच ते गेलं पाहिजे, याची काळजी घ्यावी, असं रोहित पवार म्हणाले. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी मतदान करणारे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक साहेब यांचं नाव मतदार यादीतून गायब आहे तर त्यांच्या कुटुंबातील तिघांची नावे तीन वेगवेगळ्या केंद्रावर आहेत. राज्याच्या एका कॅबिनेट मंत्र्यांनाच त्यांचं मतदान कुठं आहे हे माहित नसेल तर सामान्य लोकांना हे कसं कळणार? असा सवाल देखील रोहित पवारांनी म्हटलं आहे.
निवडणूक आयोगाला उत्तर द्यावं लागेल
दरम्यान, केवळ सत्तेतील एका पक्षाच्या सोयीसाठी वॉर्ड/प्रभाग रचनेपासूनच याची सुरवात झाली असून मतदारांचे चेहरे आणि आडनाव बघून त्यांना सोयीच्या प्रभागात टाकण्यात आलं. गणेश नाईक साहेब हे सत्तेत असूनही भाजपच्या रणनीतीची शिकार झाले आहेत. संपूर्ण राज्यात हीच अवस्था असून याबाबत निवडणूक आयोगाला जबाबदारी झटकता येणार नाही, उत्तर द्यावं लागेल.., असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
