ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सूचना
ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त पुणे शहरातील हॉटेल्स, पब आणि रेस्टॉरंटमध्ये मोठी गर्दी उसळते. ही गर्दी लक्षात घेऊन मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी येत्या दोन दिवसांत सुरक्षा आणि आपत्कालीन उपाययोजनांशी संबंधित सूचनांचे परिपत्रक संबंधित आस्थापनांना पाठवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
advertisement
पोलीस उपायुक्त सोमय मुंडे (परिमंडळ ४) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पब आणि रेस्टॉरंट चालकांनी खालील बाबींची तपासणी करणे आवश्यक आहे:
प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग : इमारतीमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी पुरेसे आणि निर्धोक मार्ग उपलब्ध आहेत का, याची पाहणी करावी.
आपत्कालीन द्वार: आग लागल्यास किंवा अनुचित घटना घडल्यास ग्राहकांना त्वरित बाहेर पडण्यासाठी आपत्कालीन दरवाजे मोकळे आणि वापरासाठी तयार आहेत की नाहीत, याची खात्री करावी.
सुरक्षा व्यवस्था: सुरक्षाविषयक सर्व उपकरणे कार्यरत आहेत का, हे तपासावे.
पोलीस आणि अग्निशमन दल प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की, शहरातील व्यावसायिक आस्थापनांनी या सूचना गांभीर्याने घेऊन सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करावे, जेणेकरून कोणतीही अप्रिय घटना टाळता येईल.
