गेल्या चार दशकापासून गँगवारची सुरुवात ही आंदेकर टोळीपासून सुरू झाली होती. कारण पुण्यात गँगवॉरमधून झालेली पहिली हत्या आंदेकर टोळीच्या म्होरक्याची झाली होती. ही हत्या आंदेकर टोळीत असलेल्या प्रमोद माळवदकर याने केली होती. बाळू आंदेकर आणि प्रमोद मालवदकर या दोन मित्रांमध्ये बिनसलं आणि पुण्यात गँगवॉर सुरू झालं. मात्र या दोघांमध्ये नेमकं का बिनसलं याचं कारण ज्येष्ठ क्राईम पत्रकार आबिद शेख यांनी टॉप न्यूज मराठी या संकेतस्थळाशी सांगितलं आहे.
advertisement
पुण्याच्या गेल्या काही वर्षातील इतिहास पाहिल्यानंतर टोळी युद्धातला आणि टोळीच्या म्होरक्याचा पहिला खून हा बाळू आंदेकरचा होता. त्यानंतर पुण्यात टोळी युद्धातून अनेकांचे गेम झाले. अवैध व्यवसायातून पुण्याच्या मध्यभागात (नाना पेठ) निर्माण झालेली पहिली टोळी बाळकृष्ण ऊर्फ बाळू आंदेकर याची टोळी होती. त्यात बाळू आंदेकर आणि प्रमोद माळवदकर हे दोघे मुख्य भूमिकेत होते. सुरुवातीला ते दोघे एकत्र काम करत होते. मात्र एका प्रेम प्रकरणामुळे प्रमोद माळवदकर आणि आंदेकरमध्ये बिनसलं. त्यानंतर 1980 च्या दशकात वेगळे होत स्वत:ची टोळी सुरू केली.
बाळू आंदेकर आणि प्रमोद माळवदकरमध्ये नेमकं का बिनसलं?
पुण्यात गेल्या पाच दशकात सर्वात गाजलेलं टोळीयुद्ध हे आंदेकर आणि माळवदकर यांचे आहे. या दोन टोळीमध्ये युद्ध 1980 च्या नंतर सुरू झाले. त्याच कारण असे की प्रमोद माळवदकर हा वेगळ्या टोळीतील नव्हता . प्रमोद माळवदकर हा बाळू आंदेकरचा मित्र होता. आंदेकर टोळी ही मोठी टोळी होती. त्या टोळीत बाळू आंदेकरच्या जवळ काही होते त्यांच्याशी प्रमोदची वादावादी झाली. हळूहळू त्यांच्यात खटके उडायला लागले. दरम्यान पुण्यात एका प्रेमप्रकणातून विवाह झाला. प्रेमप्रकरणातून विवाह झाला त्यातील जी मुलगी होती तिचे वडिल आंदेकर आणि मालवदकरचे मेंटॉर होते. तिचं एका मुलावर प्रेम होते मात्र तिच्या कुटुंबाना ते मान्य नव्हते. अखेर मुलगी मुलासोबत पळून गेली. त्या मुलीला परत आणण्यासाठी प्रमोद माळवदकर आणि बाळू आंदेकर चालले होते. त्यातून त्यांच्यात भांडण झाली की, मुलीचे वडील देखील आपला मित्र आणि तिला पळवून घेऊन जाणारा मुलगाही मित्र त्यातून प्रमोद आणि बाळूमध्ये बिनसलं.
दोन टोळ्यांमध्ये वर्चस्वातून वाद
प्रेमप्रकरणातून दोघांमध्ये वैमनस्य निर्माण झाले आणि प्रमोद माळवदकर हा टोळीतून बाहेर पडला. त्यानंतर पुण्याच्या पेठेमध्ये बाळू आंदेकर आणि प्रमोद माळवदकर या दोन टोळ्या निर्माण झाल्या. त्यांच्यात वर्चस्वातून वाद होत होते. या वादातून प्रमोद माळवदकराच्या वडिलांचा खून आंदेकर टोळीने केला आणि तेथून दोन टोळ्यांमधील रक्तरंजित प्रवास सुरू झाला. माळवदकर टोळीने देखील या खूनाचा बदला घेण्यासाठी शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात बाळू आंदेकर याचा 1984 साली खून केला. या टोळीयुद्धातून अनेकांची हत्या झाली.
एन्काऊंटर अन् आंदेकर- माळवदकर गँगवॉर संपलं
1997 साली पुणे पोलिसांनी काळेवाडीत प्रमोद माळवदकर याचा इन्काऊंटर केला . त्यानंतर प्रमोद माळवदकर व आंदेकर टोळीयुद्ध संपुष्टात आले. त्यानंतर आंदेकर टोळीचे वर्चस्व या काळात मोठ्या प्रमाणात वाढलेले होते. बाळू आंदेकर याच्यानंतर सूर्यकांत ऊर्फ बंडु आंदेकर याच्याकडे टोळीची सुत्रे आहेत.