22 वर्षांची ही तरुणी, जमिनीच्या वादातून तिला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जमिनीत गाडलेल्या या तरुणीनं स्वतःच पोलिसात तक्रार दिली आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यात तरुणी कंबरेपर्यंत मातीत गाडलेली असल्याचं दिसचं आहे.
advertisement
4 जणांवर गुन्हा दाखल
तरुणीनं घडलेल्या घटनेबाबत पोलीस स्टेशनमध्ये रितसर लेखी तक्रार दिली आहे. राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 307 प्रमाणे 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजी खोपडे, तानाजी खोपडे, बाळू भोरकर, उमेश जयस्वाल अशी त्यांची नावं आहेत. या चार जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न, शिवीगाळ धमकावणं यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
आईनंच मुलीला जिवंत पुरलं
गेल्यावर्षी बिहारच्या पाटणामध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीला तिच्या जन्मदात्या आईनंच जिवंत जमिनीत पुरलं. तिने श्वास घेतल्यावर आणि हालचाल केल्यावर जमीन हालत होती. यावरूनच ही घटना उघडकीस आली.
Crime News : विवाहित महिलेशी अनैतिक संबंध! प्रियकराची पत्नी आणि बहिणीने असा काढला काटा
ही घटना कोपा मरहा नदीच्या काठावरील स्मशानभूमीतील आहे. घरगुती कामासाठी स्थानिक महिला तिथे पोहोचल्या होत्या. अचानक त्यांना एके ठिकाणची माती हालत असल्याचं दिसलं. त्यानंतर त्यांनी आरडाओरड करत ग्रामस्थांना बोलावलं. ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना (Police) दिली. पोलिसांनी मुलीला जमिनीतून बाहेर काढलं. स्थानिक एसएचओ आणि एएसआय रवींद्र सिंह यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला आणि मुलीला उपचारांसाठी सदर रुग्णालया पाठवलं. या मुलीला काही वेळापूर्वीच जमिनीत पुरण्यात आलं असावं, त्यामुळे मुलगी वाचली, असं पोलिसांचं म्हणणं आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.