या महामार्गाची कामे पूर्ण झाल्यानंतर चाकण औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही वर्षांत या परिसरात उद्योगांची झपाट्याने वाढ झाली असून, त्यामुळे वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवले पुलावरील मृत्यूचे सत्र थांबणार! काय आहे सरकारचा 6 हजार कोटींचा 'मास्टर प्लॅन'?
advertisement
कामे करताना दर्जा राखत ती निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. विधान भवन येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली.
तळेगाव–चाकण ते शिक्रापूर महामार्ग 4 पदरीकरणाला मंजुरी
पुणे जिल्ह्यातील तळेगाव ते चाकण (क्रमांक 548 डी) राष्ट्रीय महामार्गाच्या विकासाला अखेर गती मिळाली आहे. या मार्गाच्या 0 ते 26 किलोमीटर पट्ट्यात 4 पदरी उन्नत मार्गासोबतच 4 पदरी समांतर रस्ता उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, चाकण ते शिक्रापूर या 26 ते 43 किलोमीटर दरम्यानच्या टप्प्यात 4 पदरी समांतर महामार्ग विकसित केला जाणार आहे.
दरम्यान, हा प्रकल्प डीएफबीओटी (डिझाईन, फायनान्स, बिल्ड, ऑपरेट अॅन्ड ट्रान्सफर) तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. 4,207 कोटींच्या या प्रकल्पामुळे चाकण औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार असून मोंटे कार्लो लिमिटेड कंपनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे.






