TRENDING:

Pune Metro: पुणेकरांचा प्रवास सोपा, हिंजवडी मेट्रो थेट शिवाजीनगरपर्यंत जाणार, महत्त्वाचं अपडेट

Last Updated:

Pune Metro: पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता हा मेट्रो दुवा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पुणेकरांचा प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
पुणे : पुणेकरांसाठी खूशखबर असून हिंजवडी ते शिवाजीनगर प्रवास सोपा आणि सुरक्षित होणार आहे. हिंजवडी मेट्रो सेवा लवकरच शिवाजीनगरपर्यंत सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, या मार्गाचे शेवटचे स्थानक असलेल्या जिल्हा न्यायालय परिसरातून थेट मेट्रो स्थानकात प्रवेश मिळावा यासाठी 138 मीटर लांबीच्या पादचारी पुलाच्या उभारणीला सुरुवात करण्यात आली आहे.
Pune Metro: पुणेकरांचा प्रवास सोपा, हिंजवडी मेट्रो लवकरच शिवाजीनगरपर्यंत जाणार, महत्त्वाचं अपडेट
Pune Metro: पुणेकरांचा प्रवास सोपा, हिंजवडी मेट्रो लवकरच शिवाजीनगरपर्यंत जाणार, महत्त्वाचं अपडेट
advertisement

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) यांच्या माध्यमातून हा पूल उभारण्यात येत असून, हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्ग उभारण्याचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडून करण्यात येत आहे. चार मीटर रुंदीच्या या पादचारी पुलासाठी एकूण सहा कॉलम उभारले जाणार असून, त्यापैकी तीन कॉलमचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. उर्वरित कामही वेगाने सुरू असून पुढील तीन महिन्यांत पूल पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

advertisement

पुणेकरांनो, श्वास घेताय की विष? 'त्या' 7 लाख गाड्यांमुळे आयुष्य होतंय कमी; सर्वेक्षणात मोठे खुलासे!

या पुलामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान धावणारी पुणेरी मेट्रो अर्थात लाईन 3 थेट जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकाशी जोडली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दोन्ही मेट्रो मार्गांदरम्यान जलद आणि सुरक्षित बदल करता येणार आहे. विशेषतः आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरातील हजारो कर्मचाऱ्यांना या सेवेचा मोठा फायदा होणार आहे.

advertisement

View More

दरम्यान, हिंजवडी-शिवाजीनगर मार्गावरील मेट्रोची चाचणी पूर्ण झाल्याचा दावा पीएमआरडीएकडून करण्यात आला आहे. एप्रिलपर्यंत हा मार्ग सुरू करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले जात असले, तरी शिवाजीनगर स्थानकावरील काही कामे अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे अंतिम टप्प्यातील कामे वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक ठरणार आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली अन् ‘मायमराठी’च्या सेवेत हजर, पुणेकराचं काम पाहाल, तर सलाम कराल, Vid
सर्व पहा

दरम्यान, शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता हा मेट्रो दुवा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पादचारी पुलाच्या उभारणीमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरणार असून पुणेकरांसाठी ही मोठी सुविधा ठरणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Metro: पुणेकरांचा प्रवास सोपा, हिंजवडी मेट्रो थेट शिवाजीनगरपर्यंत जाणार, महत्त्वाचं अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल