कसबा गणपती मंदिरासमोर उभं राहिलं तर डाव्या बाजूला जो रस्ता जातो त्या भागात आतमध्ये तांबट आळी आहे. या गल्लाीतल्या प्रत्येक छोट्या छोट्या घरात तांब्या पितळ्याची भांडी घडवायचं काम वर्षानुवर्षं चालू आहे. देवघरातील मूर्ती, ताटं, वाट्या, भांडी, शोभेच्या वस्तू, लहान मुलांची भातुकली, गृह सुशोभीकरणाचा अनंत वस्तू असा सर्व खजिना इथे बनतो.
advertisement
पुण्यात संपूर्ण दगडी बांधकामाचे आहे हे मंदिर; इंग्रजांच्या राजवटीबद्दल आढळते भविष्यवाणी!
शिवाजी महाराजांच्या काळात या तांबट आळीतून शस्त्र तयार केली जात असत. त्यानंतर पेशवेकाळात ही मंडळी येथे तांबे-पितळ्यांची नाणी बनवत असत. मात्र नंतर भारतात ब्रिटीशांचे राज्य आले. ब्रिटिशांनी तांबट आळीतील हा व्यवसाय हाणून पाडला. त्यामुळे ९० टक्के तांब्याचा होणारा पुरवठा कमी झाला. तांब्याचा पुरवठाच कमी झाल्याने शस्त्रात्रे बनवणं येथील कारागिरांना कठीण बनलं. मात्र काहीतरी करून उदारनिर्वाह करणं गरजेच होतंच. शेवटी त्यांनी मिळणाऱ्या तांब्यापासून घरगुती भांडी तयार करणं सुरू केलं.
तबक, स्वाग, रेनंद, तेजप, पत्री, खरवई, खोड, मोगरी, तावकाम, खोलण्या, लोखंडी उबाळा, लोखंडी आडी, दांडकं अशा विविध अवजारांचा वापर करून ही भांडी बनवली जातात.’ हा व्यवसाय हस्तकौशल्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे. या व्यवसायाने परदेशी बाजारपेठेतही आपले बस्तान बसवलेले आहे.
पारशी जेवण मिळणारं पुण्यातील अस्सल हॉटेल, 144 वर्षांपासून जपलीय परंपरा
शंभर वर्षांपूर्वी या पुण्यामध्ये तांब्या पितळेची भांडी तयार करण्याचे कारखाने नव्हते, भांडी परगावाहून पुण्यात येत असत असं सांगण्यात येतं. मात्र कालांतराने पुण्यात प्रगती झाली. त्यामुळे पुण्यातही कारखाने उभे राहू लागले.सतत बदलत राहणे हा काळाचा गुणधर्म आहे. म्हणून काळाच्या प्रवाहाबरोबर जो राहतो तोच टिकतो. तांबट व्यवसायाचेही असेच झाले. तांबट व्यवसायातील कारागिरांनी आपल्या व्यवसायात आधुनिकता आणली नाही, परिणामी त्यांचा व्यवसाय आता लोप पावण्याच्या मार्गावर आहे.
पुण्यात या प्रकारचे शंभरपेक्षा जास्त कारखाने होते, त्याच ठिकाणी आता केवळ 25 ते 30 कारखाने शिल्लक आहेत. काळाच्या प्रवाहाबरोबर जो राहतो तोच टिकतो. तांबट व्यवसायाचेही असेच झाले. तांबट व्यवसायातील कारागिरांनी आपल्या व्यवसायात आधुनिकता आणली नाही. त्यामुळे त्यांचा व्यवसाय आता लोप पावण्याच्या मार्गावर आहे. तांबट आळी म्हणजे पारंपरिक हस्तकलने तांब्याच्या टिकाऊ वस्तू तयार करणारे विश्व आता स्वतःच्या अस्तित्वाची लढाईच लढत आहेत.





