'या' शहरांतील सेवा बाधित
रद्द झालेल्या विमानांमध्ये नागपूर, बंगळूरु, दिल्ली, जयपूर, अहमदाबाद, कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांना जाणारी विमाने होती. केवळ विमाने रद्द झाली नाहीत, तर बंगळूरु, दिल्ली आणि कोचीसह इतर अनेक शहरांना जाणाऱ्या सकाळच्या अनेक विमानांना अपरिहार्य विलंबही झाला.
या गोंधळामागील मुख्य कारण म्हणजे 'फ्लाइट क्रू'ची असलेली कमतरता. तसंच, नवीन पायलट ड्युटी नियम लागू झाल्यामुळे क्रूची उपलब्धता कमी झाली आहे. क्रूची कमतरता, तांत्रिक त्रुटी, वाढलेली गर्दी आणि इतर ऑपरेशनल कारणांमुळे देशभरातील बऱ्याच शहरांमध्ये इंडिगोच्या उड्डाणांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.
advertisement
मोठी बातमी! पश्चिम रेल्वेचा 60 दिवसांचा ब्लॉक जाहीर; वेळापत्रक पूर्णपणे बदलणार
भरपाईचे नियम कडक करण्याची मागणी
प्रवाशांना झालेल्या या मोठ्या गैरसोयीबद्दल हवाई वाहतूक तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. धैर्यशील वंडेकर (हवाई वाहतूक तज्ज्ञ) यांनी, उड्डाणे विलंबित किंवा रद्द झाल्याने प्रवाशांचे झालेले नुकसान, वाया गेलेला वेळ आणि अन्य गैरसोयीचा योग्य विचार करून न्याय्य भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. यासाठी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालय तसेच डीजीसीए (DGCA) ने कठोर नियम लागू करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. इंडिगोने प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून, विमानांच्या वेळापत्रकात लवकरच सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे.
