पंढरपूर येथील जुना कराड नाका येथील गाताळे प्लॉट, मागाडे वाड्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी पायघड्या टाकल्या होत्या, महिलांनी बाबासाहेबांची आरती केली आणि जमलेल्या लोकांना बाबासाहेबांनी मार्गदर्शन केले होते. तसेच लोकांना स्वच्छता व शिक्षणाचे महत्त्व सांगितले होते. आता त्याच ठिकाणी बाबासाहेबांची आठवण म्हणून लोकवर्गणीतून बौद्ध विहार बांधण्यात आले आहे.
advertisement
पंढरपुरातील जुना कराड नाका येथे जेव्हा बाबासाहेब आले होते, तेव्हा ज्या जुन्या लोकांनी त्यांना पाहिलं होतं, त्या लोकांचा गावकऱ्यांनी जिवंत असेपर्यंत सन्मान केला. तसेच याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. तसेच बुद्ध पौर्णिमा व महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो. 31 डिसेंबर 1937 रोजी बाबासाहेबांनी जुना कराड नाका येथे भेट दिली होती तो भेटीचा दिन देखील मोठ्या उत्साहाने या बुद्ध विहारामध्ये साजरा केला जातो.





