कुठे द्याल भेट?
हिंजवडी पासून 12 ते 15 किमीच्या अंतरावर असलेलं हे कासारसाई धरण पर्यटकासाठी अतिशय उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणाला भेट देण्यासाठी पर्यटकाची मोठी गर्दी पाहिला मिळते. तसेच इथे अनेक गोष्टीचा आनंद लुटता येतो. हा परिसर जर पाहिला तर इथे संपूर्ण चारी बाजूने डोंगर कडा आहेत आणि अगदी जवळच आय टी पार्क देखील पाहिला मिळते.
advertisement
घर सजावटीसाठी आकर्षक वस्तूंची खरेदी करायचीय? लोणावळ्यात आला तर इथं भेट द्या PHOTOS
बोटिंग रायडींग, तसेच बाईक रायडींग, लहान मुलांना खेळण्यासाठी, राहण्यासाठी टेन्ट, जेवण्यासाठी उत्तम असे हॉटेल. त्याच धरणा शेजारी फिल्म सिटी अशा सर्वच गोष्टी तुम्हाला इथे पाहिला मिळतात. त्यामुळे इथे येणारा पर्यटक हा अगदी ह्या निसर्ग सौंदर्यात रममाण होतो. त्यामुळे जर फिरण्याचा प्लॅन करत असाल तर यां ठिकाणाला आवर्जून भेट देऊ शकता.
फक्त 10 रुपयांपासून मिळतील घर सजावटीच्या हटके वस्तू, पुण्यातल्या ‘या’ ठिकाणी करा खरेदी
निसर्ग सौंदर्य तर अप्रतिम
मी स्वतः वकील आहे आणि ही माझी सातवी वेळ इथे येण्याची आहे. एक दिवसाच्या सहलीसाठी किंवा फॅमिली सोबत येण्यासारखं हे ठिकाण आहे. रोजच्या धावपळीच्या जीवनातून एक दिवस विरंगुळा आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आम्ही याठिकाणाला आवर्जून भेट देतो. इथले निसर्ग सौंदर्य तर अप्रतिम असं आहे. लहान मुलापासून ते अगदी मोठ्या पर्यंत येणाऱ्यांना इथे मस्त एन्जॉय करता येतो, असं पर्यटक ललिता गोटे यांनी सांगितलं.