मिळालेल्या माहितीनुसार, 40 भाविकांनी भरलेली एक पिकअप गाडी पुण्याच्या खेड तालुक्यातील कुंडेश्वरच्या दर्शनाला निघाली होती. यावेळी घाट माथ्यावर अपघात होऊन पिकअप थेट शंभर फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत 10 भाविक महिलांचा जागीच मृत्य झाला आहे. तर 25 महिला भाविकांची व दोन लहान मुल गंभीर जखमी आहेत.या घटनेनंतर या अपघाताला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
advertisement
दरम्यान या घटनेतील 10 महिला भाविकांच्या मृत्यूप्रकरणी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात चालकावरती संदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण एकीकडे पोलिसांकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला तर ग्रामस्थांनी या प्रकरणात वेगळीच बाजू उजेडात आणली आहे. कुंडेश्वर देवस्थान क वर्ग दर्जाचे झाल्यानंतर या परिसरात झालेल्या विकास कामांमधील रस्ते खड्डेमय झाले आहेत आणि घाट तयार करताना तांत्रिक बाबी न तपासल्याने घाटाचा भाग मोठा झाला होता.तसेच रस्त्याला सरंक्षण जाळी देखील नसल्याने हा अपघात घडला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे ही गाडी ओव्हरलोड असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे या अपघातानंतर चालकावरती ही संदोष मनुष्यवधाचा गुन्हा म्हाळुंगे पोलीस ठाण्यात दाखल झालाय. पण आता ग्रामस्थांची बाजू पाहता या अपघाताला जबाबदार कोण? याची चौकशी व्हायला हवी अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या घटनेचा अधिकचा तपास सूरू आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
