समोर आलेल्या व्हिडीओनुसार, दोन-तीन चोरटे पहाटेच्या वेळी एका कारमधून येताना दिसत आहे. काही मिनिटे परिसराची रेकी केल्यानंतर सरपंचांची फॉर्च्युनर गाडी घेऊन फरार झाले. महत्त्वाचे म्हणजे जिथे गाडी पार्क करण्यात आली तिथे सुरक्षारक्षक देखील तैनात होते. या दरम्यान परिसरात गस्त घालणाऱ्या सुरक्षारक्षकाला किंवा नागरिकांना काहीच संशय आला नाही. चोरीची लक्षात येताच माजी सरपंच संदीप ढेरंगे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
advertisement
रेकी करत गाडी चोरण्याचा प्लान
प्राथमिक अंदाजानुसार, चोरट्यांनी या परिसरात रेकी होती. गाडी कधी पार्क केली जाते किंवा सुरक्षारक्षक त्या परिसरात कधी नसतात, याचा रेकी करत गाडी चोरण्याचा प्लान केला. फॉर्च्युनरमध्ये आधुनिक सुरक्षा लॉकिंग सिस्टीम असतानाही, चोरट्यांनी स्कॅनर’ किंवा की क्लोनिंग डिव्हाईसचा वापर करून काही क्षणांत गाडी चोरी केली, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
सर्व नाक्यांवर अलर्ट जारी
शिक्रापूर पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत. तसेच सर्व नाक्यांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ विशेष तपास पथक स्थापन केले आहे.
वाहन सुरक्षा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
अशा प्रकारच्या घटनांमुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाहन सुरक्षा हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गावातील सरपंचांच्या गाडीची चोरी झाल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. फॉर्च्युनरसारखी आलिशान आणि सुरक्षित गाडी जर काही मिनिटांत गायब होऊ शकते, तर सामान्य नागरिकांच्या वाहनांचे काय? असा प्रश्न लोकांतून उपस्थित होत आहे. गावातील नागरिकांनी पोलिसांकडे रात्रगस्त वाढवण्याची आणि प्रमुख रस्त्यांवर अतिरिक्त सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केली आहे.