गाडीचं नियंत्रण सुटलं अन्...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालक मद्यपान (car driver hit the vehicles while drunk) करून गाडी चालवत होता आणि त्यामुळेच त्याचे नियंत्रण सुटले व त्याने उभ्या असलेल्या दुचाकींना उडवले. सुदैवाने या अपघातात (No one injured in accident) कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि कुणीही जखमी झालेले नाही.
advertisement
पाहा Video
चालकाविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, या अपघाताचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ (CCTV of the accident goes viral) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात भरधाव कार दुचाकींना धडक देताना दिसत आहे. अलंकार पोलीस स्टेशनमध्ये या मद्यधुंद कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, पुण्यातून गुन्हेगारीच्या घटना देखील समोर येत आहेत. पुण्यात (Pune Crime) वास्तव्यास असलेल्या तरुणीने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या आणि सोशल मीडियावर पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याची तक्रार पुणे (Pune Crime) शहरातील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी या तरुणीला अटक केली आहे.
