TRENDING:

Animal Rescue: 'त्यांनाही जीव आहे', पुण्यातील सर्परक्षकाचे प्रेरणादायी कार्य, Video

Last Updated:

Animal Rescue: अनेकदा माणूस आपल्या स्वार्थासाठी मुक्या प्राण्यांना इजा करतो. मात्र, काही माणसं अशीही असतात ज्यांच्या मनात या मुक्या जीवांसाठी अपार प्रेम असतं. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: जन्माला आलेल्या प्रत्येक सजीवाला जगण्याचा हक्क असतो, मग तो माणूस असो किंवा वन्य प्राणी. पण, बऱ्याचदा माणूस हे विसरतो की, मुक्या प्राण्यालाही जीव आहे. अनेकदा माणूस आपल्या स्वार्थासाठी मुक्या प्राण्यांना इजा करतो. मात्र, काही माणसं अशीही असतात ज्यांच्या मनात या मुक्या जीवांसाठी अपार प्रेम असतं. पुण्यातील सर्परक्षक आनंद अडसूळ यांचा अशाच व्यक्तींमध्ये समावेश होतो.
advertisement

आनंद अडसूळ हे 'वाईल्ड अ‍ॅनिमल्स अँड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटी' या संस्थेचे अध्यक्ष आहेत. ते अनेक वर्षांपासून आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने प्राणी आणि पक्ष्यांसाठी काम करत आहेत. अडसूळ हे 24 तास विनामूल्य वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे रेस्क्यू, उपचार आणि पुनर्वसनाचे कार्य करतात. मुक्या जीवांच्या रक्षणासाठी काम करत त्यांनी एलएलबी, एलएलएमची पदवी पूर्ण केली.

advertisement

त्यांना ही जीव आहे

सर्परक्षक आनंद अडसूळ व त्यांच्या संस्थेमधील सर्परक्षक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धोकादायक परिस्थितीत वन्यप्राण्यांच्या मदतीसाठी धाव घेतात. अनेक वेळा स्थानिक नागरिक घाबरून मागे हटतात. पण, अडसूळ आणि त्यांची टीम शांतपणे परिस्थिती हाताळते. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अनेक वन्यप्राण्यांना जीवदान मिळालं आहे.

View More

पुण्याचा बटरफ्लाय बॉय! सिमेंटच्या जंगलात फुलवली फुलपाखरांची उद्यानं, पाहा काय केलं?

advertisement

प्राणीच नाही तर समाजासाठीही सक्रिय

प्राण्यांवरील अत्याचारांविरोधात कायदेशीर कारवाई, गोरक्षण, शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती, तसेच अनाथ आणि गरजू मुलांना शालेय साहित्य वाटप आणि वयोवृद्धांकरिता औषधोपचारात मदत, असे विविध समाजोपयोगी उपक्रम आनंद अडसूळ राबवत आहेत. तसेच नदी-नाले स्वच्छता मोहीम, स्वच्छतेसाठी जनजागृती, आणि मानवतेला प्राधान्य देणारे उपक्रम देखील प्रभावीपणे पार पाडत आहेत.

advertisement

कोणताही प्राणी अडचणीत सापडला, अडसूळ यांची टीम लगेच मदतीला धावते. निसर्गाशी आणि मुक्या जीवांशी जिव्हाळ्याचं नातं ठेवून 'फक्त एक जीव वाचावा' ही भावना ठेवून ते दिवसरात्र झटत आहेत.

मराठी बातम्या/पुणे/
Animal Rescue: 'त्यांनाही जीव आहे', पुण्यातील सर्परक्षकाचे प्रेरणादायी कार्य, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल