Bus Accident: लालपरीही सुरक्षित नाही, सहलीच्या आनंदावर पाणी, मंचरजवळ 20 विद्यार्थी पाच शिक्षक जखमी

Last Updated:

Bus Accident: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरजवळ सहलीच्या दोन एसटी बसचा मोठा अपघात झाला. या अपघातात संगमनेर इथे सह्याद्री ज्युनिअर कॉलेजचे २० विद्यार्थी आणि ५ शिक्षकांसह एकूण २५ जण जखमी झाले आहेत.

News18
News18
डिसेंबर महिन्यात वन भोजन, सहल असे काही छोटे उपक्रम शाळा राबवत असतात. सहलीसाठी खासगी बस वापरल्या जाऊ नयेत असं सरकारने शाळांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार लालपरीमधूनच सहलींसाठी विद्यार्थ्यांना न्यावं असं सांगितलं असताना आता लालपरी देखील सुरक्षित नाही हे समोर आलं आहे. लालपरीतून सहलीला निघालेल्या दोन बसचा भीषण अपघात झाला.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरजवळ सहलीच्या दोन एसटी बसचा मोठा अपघात झाला. या अपघातात संगमनेर इथे सह्याद्री ज्युनिअर कॉलेजचे २० विद्यार्थी आणि ५ शिक्षकांसह एकूण २५ जण जखमी झाले आहेत. मंचरजवळच्या एकलहरे येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.
कसा झाला अपघात?
संगमनेर येथील सह्याद्री ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची सहल एस.टी.च्या चार बसमधून कोळग डेअरीसाठी गेली होती. कोळग डेअरीहून परत संगमनेरला जात असताना, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरजवळच्या एकलहरे येथे अपघात झाला. एकलहरे येथे रस्त्यावर असलेल्या स्पीड ब्रेकरमुळे पहिल्या बसचा स्पीड अचानक कमी झाला. मागे असलेल्या दुसऱ्या एस.टी. बसच्या चालकाच्या हे लक्षात आले नाही आणि त्याने पहिल्या बसला जोरदार धडक दिली.
advertisement
मागून आलेल्या बसचा पुढच्या भागाला मोठं नुकसान झालं. काचा फुटल्या, धडक बसल्यामुळे बसचं मोठं नुकसान झालं. अपघातात दोन्ही एसटी बसचे मिळून एकूण दोन लाख रुपयांचे नुकसान झालं. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. विद्यार्थी आणि शिक्षण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 2 लाख रुपयांच्या आसपास बसचं नुकसान झालं आहे.
advertisement
जखमींना तात्काळ मदत
अपघातात जखमी झालेल्या २० विद्यार्थी आणि ५ शिक्षकांना तात्काळ मंचर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. राज्य परिवहन महामंडळाने जखमींना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी एक हजार रुपये आणि अन्य जखमींना २० हजार रुपये रोख मदत दिली आहे. सर्व जखमी प्रवाशी सुखरूप असल्याची माहिती मंचर आगारप्रमुख बसंत अरगडे यांनी दिली आहे. जखमींना संगमनेर येथे सोडण्यासाठी मंचर आगाराच्या दोन एसटी बसद्वारे व्यवस्था करण्यात आली आहे. या अपघातामुळे पुणे-नाशिक महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. मात्र स्थानिक आणि पोलिसांनी तात्काळ ही वाहतूक कोंडी सोडवली.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Bus Accident: लालपरीही सुरक्षित नाही, सहलीच्या आनंदावर पाणी, मंचरजवळ 20 विद्यार्थी पाच शिक्षक जखमी
Next Article
advertisement
BMC Election : महापालिका निवडणुकांचे काउंटडाऊन सुरू, बिगुल कधी वाजणार, मतदानाच्या तारखेबाबत समोर आली मोठी अपडेट
महापालिकांचे काउंटडाऊन सुरू, बिगुल कधी वाजणार, मतदानाच्या तारखेबाबत समो
  • महापालिकांचे काउंटडाऊन सुरू, बिगुल कधी वाजणार, मतदानाच्या तारखेबाबत समो

  • महापालिकांचे काउंटडाऊन सुरू, बिगुल कधी वाजणार, मतदानाच्या तारखेबाबत समो

  • महापालिकांचे काउंटडाऊन सुरू, बिगुल कधी वाजणार, मतदानाच्या तारखेबाबत समो

View All
advertisement