भरत गोगावलेंविरोधातला चित्रलेखा पाटलांचा कॅश बॉम्ब निघाला फुसका, खरा VIDEO आला समोर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या विरोधात कॅश बॉम्ब टाकला होता. त्यांनी सोशल मीडियावर क्रॉप केलेला व्हिडीओ टाकत खळबळ उडवून दिली होती.
मोहन जाधव, प्रतिनिधी रायगड: हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यात दोन कॅश बॉम्ब टाकण्यात आले होते. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिवसेना शिंदे गटाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्याविरोधात कॅश बॉम्ब टाकला होता. त्यांनी एक्स अकाऊंटवर नोटांच्या बंडलचे काही व्हिडीओ शेअर केले होते. या व्हिडीओतील आमदार कोण? असा सवाल दानवेंनी विचारला होता.
याच दिवशी शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या विरोधात कॅश बॉम्ब टाकला होता. त्यांनी सोशल मीडियावर क्रॉप केलेला व्हिडीओ टाकत खळबळ उडवून दिली होती. मात्र चित्रलेखा पाटील यांचा हा कॅश बॉम्ब फुसका निघाल्याचं समोर आलं आहे. पाटील यांनी शेअर केलेल्या व्हिडीओतून पैसे मोजणारी व्यक्ती भरत गोगावले नसल्याचं समोर आलं आहे.
advertisement
नेमका कॅश बॉम्ब काय होता?
शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर दोन व्हिडिओ क्लिप आणि दोन फोटो शेअर करत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्याविरोधात कॅश बॉम्ब फोडला होता. पण चित्रलेखा पाटलांचा हा कॅश बॉम्ब फुसका ठरला आहे. एका व्हिडिओमध्ये पैसे मोजणारी व्यक्ती भरत गोगावले नसल्याचं स्पष्ट होत आहे.
advertisement
शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी भरत गोगावले यांच्याविरोधात टाकलेला कॅश बॉम्ब निघाला फुसका... pic.twitter.com/uDajnGqi5J
— News18Lokmat (@News18lokmat) December 12, 2025
तर दुसरा व्हिडिओ हा गोगावले यांच्या निवासस्थानचा असून यामध्ये एक वयोवृध्द व्यक्ती गोगावले यांना एक कागद देत आहे. मात्र तो कागद अंगरक्षकाने हातात घेत टेबलावर ठेवला. त्यामुळे मुळचा हा व्हिडिओ क्रॉप करीत चित्रलेखा पाटील यांनी शेअर केल्याचं दिसून येत आहे. मंत्री भरत गोगावले यांच्या मीडिया टिमनेच हा व्हिडिओ बाहेर काढला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
view commentsLocation :
Raigad,Maharashtra
First Published :
December 12, 2025 11:27 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भरत गोगावलेंविरोधातला चित्रलेखा पाटलांचा कॅश बॉम्ब निघाला फुसका, खरा VIDEO आला समोर








