Vastu Tips: आयुष्याला अनपेक्षित गती येईल! घरात आग्नेय दिशेला लावलेला हा एक फोटो लय फायद्याचा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Red Running Horses: वास्तुशास्त्रानुसार घरात काही विशिष्ट फोटो लावणे फायद्याचे ठरेल. वास्तुशास्त्र तज्ज्ञ हिमाचल सिंह यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. आर्थिक समस्या, कामातील आत्मविश्वास कमी..
मुंबई : घरात कुठेही कोणताही फोटो लावण्यापेक्षा फोटो लावताना त्यामागील वास्तुशास्त्र समजून घ्यावे. काही ठराविक फोटो विशिष्ट दिशेला लावल्यास त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतात, असं सांगितलं जातं. वास्तुशास्त्रानुसार घरात काही विशिष्ट फोटो लावणे फायद्याचे ठरेल. वास्तुशास्त्र तज्ज्ञ हिमाचल सिंह यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. आर्थिक समस्या, कामातील आत्मविश्वास कमी झालेल्या लोकांसाठी आज सांगितला जाणारा उपाय फार कामाचा ठरू शकतो.
वास्तुशास्त्रानुसार एक साधा उपाय अनेक कामांसाठी लकी ठरणार आहे. धावणाऱ्या घोड्यांचा फोटो तुम्ही घरात किंवा कामाच्या ठिकाणी योग्य दिशेला लावल्यास त्याचे जबरदस्त परिणाम तुम्हाला मिळतील. दोन लाल रंगाचे घोडे धावत असलेला फोटो आणा. किंवा इंटरनेटवर सर्च करून आवडीनुसार फोटो सिलेक्ट करून घ्या, तो फोटो प्रिंट करून फ्रेम करून घरी आणा. फोटो फ्रेम लाल रंगाच्या फ्रेममध्ये बसवून घ्या. हा उपाय करताना लाल रंग खूप महत्त्वाचा मानला जातो, त्यामुळे फ्रेम लालच असायला हवी.
advertisement
धावणाऱ्या घोड्यांचा फोटो नेहमी घराच्या आग्नेय दिशेला (दक्षिण-पूर्व) लावा. दक्षिण-पूर्व दिशा ही घरामध्ये ऊर्जा आणि आर्थिक गती आणण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. म्हणून, या दिशेला धावणाऱ्या लाल घोड्यांचा फोटो लावला तर घरात उत्साहाचं वातावरण तयार होतं, असं मानलं जातं.
फोटोतील घोडे समोरच्या दिशेनं धावताना दिसणारे असावेत, त्यांचं तोंड कोणत्याही भिंतीकडे नसावे. फोटो अशा जागी लावा जिथे सहजपणे तुमची नजर जाईल आणि त्या घोड्यांच्या गतीचा परिणाम जिवंत वाटेल.
advertisement
घरात योग्य दिशेला असा फोटो लावल्यानं आर्थिक अडचणी कमी व्हायला मदत होते. खासकरून जर तुम्हाला खूप दिवसांपासून पैशांची अडचण, कर्ज, अडकलेली कामं, कोर्ट-केस किंवा कशातूनही सुटका मिळत नसेल, तर हा फोटो लावल्याने परिस्थितीत सुधारणा येऊ लागते. काही लोकांच्या म्हणण्यानुसार, यामुळे मनातली गोष्ट बोलण्याची हिंमत वाढते, आत्मविश्वास वाढतो आणि पैसे मागताना किंवा आपलं काम पुढे नेताना वाटणारी लाज किंवा संकोच कमी होतो.
advertisement
जर तुम्ही एखादं काम खूप दिवसांपासून पुढे ढकलत असाल किंवा काही नवीन सुरू करायची तयारी करत असाल, तर हा उपाय तुमच्यासाठी उपयुक्त मानला जातो. या फोटोचा परिणाम साधारणपणे 45 दिवसांच्या आत दिसायला लागतो, असं म्हटलं जातं. त्यामुळे आजच हा फोटो तुमच्या घराच्या आग्नेय दिशेला लावून तुम्ही येणाऱ्या काळात बदल अनुभवू शकता.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 12, 2025 11:10 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vastu Tips: आयुष्याला अनपेक्षित गती येईल! घरात आग्नेय दिशेला लावलेला हा एक फोटो लय फायद्याचा









