Shaniwar: साडेसाती असो की अडीचकी..! शनिदोषातून सुटका मिळवण्यासाठी ही फुले शनिला अर्पण करणं शुभ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shaniwar Astrology: शनिदेवाला त्यांची आवडती फुले अर्पण केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळू शकतात. यामुळे शनीच्या अडीचकी आणि साडेसातीचे परिणाम कमी करता येतात. अशा फुलांबद्दल, शनिदेवाला अर्पण करण्याचे फायदे जाणून घेऊया.
मुंबई : आपल्या सर्वांना माहीतच असेल शनिवारी हनुमान आणि शनिदेवाची पूजा केली जाते. शनिचा दिवस असल्यानं शनिवारी भाविक शनी मंदिरात गर्दी करतात. शनिची कृपा असावी असं सगळ्यांनाच वाटतं. शनिदेवाची विशेष प्रार्थना करून त्यांना त्यांची आवडती फुले अर्पण केल्यास लाभ होतो. शनिदेवाला त्यांची आवडती फुले अर्पण केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळू शकतात. यामुळे शनीच्या अडीचकी आणि साडेसातीचे परिणाम कमी करता येतात. अशा फुलांबद्दल, शनिदेवाला अर्पण करण्याचे फायदे जाणून घेऊया.
शनिसाठी आकची फुले - शनिवारी शनिदेवाला निळ्या रंगाचे आकची फुले अर्पण करणे निश्चित लाभदायी ठरू शकते. हा उपाय जीवनात सकारात्मकता आणतो, कुंडलीतील शनीच्या अडीचकी आणि साडेसातीचे परिणाम कमी करतो.
अपराजिताची फुले - शनिदेवाला अपराजिताची फुले खूप प्रिय मानली जातात. शनिवारी लवकर शनिदेवाची पूजा करून त्यांना 5, 7 किंवा 11 अपराजिताची फुले अर्पण करा. या उपायाने शनिदेव लवकर प्रसन्न होतात, तुम्हाला त्रासांपासून मुक्त करतात, तुमच्या कष्टाचे पूर्ण फळ मिळवून देतात.
advertisement
जास्वंदीची फूले - शनिवारी शनिदेवाला जास्वंदीची फूले अर्पण केल्याने जीवनातील सर्व त्रास कमी होतात. लाल जास्वंदीची फूले आपल्याला सहज मिळतात, देवी दुर्गेला प्रिय असली तरी, ही फूले शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी देखील अर्पण केली जातात. त्यानं शनिदोष दूर होऊन शनिदेवाचे आशीर्वाद मिळतात.
शमीची फुले - शनिवारी शनिदेवाला शमीची फुले अर्पण करावीत. यामुळे शनिदेवाचे आशीर्वाद मिळतात आणि सर्वात त्रासदायक समस्यादेखील दूर होतात. यामुळे रोगराई-आजारांमधून लवकर बाहेर पडण्यास मदत होते. सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर शनिदेवाची पूजा करण्याची प्रथा आहे; त्यावेळी शमी फुले अर्पण करा.
advertisement
शनिची पूजा कशी करावी -
शनिवार सकाळी किंवा सूर्यास्तानंतर स्नान करून काळ्या/गडद निळ्या रंगाचे स्वच्छ वस्त्र घाला. घरातील पूजास्थानात किंवा शनिमंदिरात शनिच्या प्रतिमेसमोर किंवा शनीच्या तेलाच्या दिव्यासमोर पूजा करावी. लोखंडी किंवा काळ्या रंगाची थाळी वापरणे शुभ. तिळाच्या तेलाचा काळा दिवा लावतात. ते शनिदेवांना अत्यंत प्रिय मानले जाते. शक्य असल्यास शनिच्या प्रतिमेला किंवा शनीध्वजाला जल अर्पण करा.
advertisement
पूजेत हा मंत्र म्हणत राहावे “ॐ शं शनैश्चराय नमः” मन शांत ठेवून 11, 21 किंवा 108 वेळा जप करा. नैवेद्य म्हणून काळ्या तिळाचे लाडू, उडीद डाळ वा तेलात तळलेल्या वस्तू अर्पित करा. शनिवारच्या दिवशी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. काळे कपडे, काळी उडीद, तिळाचे तेल, लोखंड, चप्पल/छत्री इत्यादी गरजू व्यक्तींना द्या.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 06, 2025 8:14 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shaniwar: साडेसाती असो की अडीचकी..! शनिदोषातून सुटका मिळवण्यासाठी ही फुले शनिला अर्पण करणं शुभ


