Mumbai Local News : आता महागात पडणार रेल्वेची सवारी, ती चूक केली तर थेट जेलची वारी
Last Updated:
Mumbai Local Train Fake Ticket : मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर बनावट लोकल तिकिटांची संख्या वाढली आहे. एआयने तयार झालेल्या या तिकिटांवर कारवाई करण्यासाठी रेल्वे आणि जीआरपीने फोर्ट्रेस तपासणी सुरू केली आहे. बनावट तिकीट सापडल्यास 5 ते 7 वर्षे तुरुंगवास होऊ शकतो.
मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात लोकलच्या बनावट तिकिटे आणि सिजन पास आढळले आहेत. अनेक प्रवासी एआयच्या मदतीने खोटी तिकिटे तयार करून प्रवास करत असल्याचे लक्षात आल्यानंतर रेल्वे प्रशासन सजग झाले आहे. वारंवार होत असलेल्या या प्रकाराला रोखण्यासाठी आता रेल्वे विभाग लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने कडक कारवाई करण्याची तयारी करत आहे.
मुंबईत सुरू होणार सर्वात मोठी कारवाई
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत दोन्ही मार्गांवर पाच एसी लोकलच्या बनावट पासची प्रकरणे समोर आली होती. याशिवाय रोजच्या प्रवासात विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढलेली दिसत आहे. त्यामुळे आता रेल्वेने दोन्ही मार्गांवर मोठ्या प्रमाणात फोर्ट्रेस तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या तपासणीत जीआरपीची मदत घेण्यात येणार आहे.
advertisement
रेल्वे प्रशासनाने याबाबत नुकतीच महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत बनावट तिकिटांचा वाढता प्रकार रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यावर चर्चा झाली. तिकिटे बनावट असल्यास ती ओळखणे कसे सोपे होईल यावरही भर देण्यात आला.
खरे तिकीट बुक केले की त्यावर अल्फान्यूमेरिक कोड तयार होतो. हा कोड स्कॅन केल्यावर तिकीट खरे आहे की बनावट हे तात्काळ समजते. बनावट तिकिटांमध्ये हा कोड अनेकदा चुकीचा किंवा वेगळा असतो. त्यामुळे तपासणी पथकांना अशा तिकिटांची ओळख पटवायला जास्त वेळ लागत नाही. एआयच्या मदतीने तयार होणारी नकली तिकिटे रेल्वेसाठी मोठे आव्हान बनली आहेत.
advertisement
नेमकं होणार तरी काय?
view commentsरेल्वेने हे सर्व प्रकार गंभीर फसवणूक मानले असून आता अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. प्रवाशांकडे जर बनावट तिकीट किंवा पास आढळला तर त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा नोंदवला जाईल. अशा प्रकारात दोषी आढळणाऱ्या प्रवाशांना 5 ते 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 06, 2025 7:55 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local News : आता महागात पडणार रेल्वेची सवारी, ती चूक केली तर थेट जेलची वारी


