Margshirsha Purnima 2025: वर्षातील शेवटच्या पौर्णिमेपासून या राशींचा चांगला काळ सुरू; धनलक्ष्मीचा आशीर्वाद
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology: पौर्णिमा-अमावस्यांना हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. महिन्यातील या दोन्ही तिथींना विविध गोष्टी केल्या जातात. संपूर्ण वर्षात एकूण 12 पौर्णिमा असतात आणि हिंदू धर्मात प्रत्येक पौर्णिमेला वेगळं महत्त्व आहे. यातील एक विशेष पौर्णिमा म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमा.
advertisement
यंदाची मार्गशीर्ष पौर्णिमा 4 डिसेंबर 2025, गुरुवारी साजरी केली जाईल. या पौर्णिमेला मोक्षदायिनी पौर्णिमा असंही म्हटलं जातं कारण ती मोक्ष देते, असे मानले जाते. या दिवशी शांती आणि समृद्धी मिळावी यासाठी अनेक धार्मिक उपाय केले जातात. पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, दान करणे आणि चंद्र देवाची पूजा करणे इ. ज्योतिषांच्या मते या वेळी मार्गशीर्ष पौर्णिमा अतिशय शुभ मानली जाते कारण या दिवसापासून काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होतील.
advertisement
advertisement
advertisement
तूळ - मार्गशीर्ष पौर्णिमा तूळ राशीसाठी विशेष शुभ मानली जाते. अचानक आर्थिक लाभ, व्यवसायात वाढ आणि कामाच्या ठिकाणी नवीन सुरुवात होण्याची शक्यता आहे. एखादे स्वप्न किंवा योजना दीर्घकाळ अपूर्ण राहिली असेल तर ती या पौर्णिमेने पूर्ण होईल, असे वाटते. कुटुंबासोबत आनंददायी वेळ जाईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)


