'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी लग्नबंधनात, कोण आहे त्याची रिअल लाइफ शिवाली?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता निमिष कुलकर्णीने नुकतंच लग्न केलं. त्याची रिअल लाईफ शिवाली कोण आहे माहितीये? मराठी मालिकाविश्वाशी तिचं खास रिलेशन आहे.
डिसेंबर महिन्यात अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधली. सूरज चव्हाण, सोहम बांदेकर-पूजा बिरारी आणि प्राजक्ता गायकवाड यांच्या लग्नानंतर आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता निमिष कुलकर्णीने देखील लग्न केलं आहे. नुकताच निमिषचा लग्नसोहळा पार पडला. निमिषच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
निमिषच्या बायकोनं लग्नात नारंगी रंगाची साडी, हिरव्या बांगड्यांचा चुडा, मुंडावळ्या आणि नथ असा पारंपरिक पोषाख केला होता. या लूकमध्ये कोमल अतिशय सुंदर दिसत होती. तर निमिषही पारंपरिक वेषात देखणा दिसत होता. लग्नाला शिवाली परब, अमृता माळवदकर, स्वानंदी बेर्डे, प्रथमेश शिवलकर यांसारख्या कलाकारांनी निमिषच्या लग्नाला उपस्थिती लावली होती.
advertisement
advertisement
advertisement


