कोणते काम करण्यात आले?
लोणावळा स्थानकावरील लोहमार्गाची लांबी सुमारे 150 मीटरने वाढवण्यात आली आहे तसेच दोन नवीन लूप लाईन्स सुरू केल्या गेल्या आहेत. त्यामुळे रेल्वेगाड्यांची हाताळणी आता जलद, सुरक्षित आणि सोपी झाली आहे. या सुधारणामुळे मुख्य लाइनवर प्रवासी गाड्यांसाठी मार्ग मोकळा राहतो तर मालगाड्यांसाठी स्वतंत्र लूप लाइन आहे.
यार्डमधील अप आणि डाउन मार्गिकांची लांबीही वाढवण्यात आली आहे. आधी 700 मीटर असलेली मार्गिका आता 850 मीटरपेक्षा जास्त झाली आहे, त्यामुळे मोठ्या मालगाड्या बँकरसह सहज मार्गिकेत येऊ शकतात. आधी पुणे-मुंबई मार्गावर मालगाड्यांमुळे प्रवासी गाड्यांना 15-20 मिनिटे थांबावे लागायचे. आता ही थांबण्याची गरज नाही.
advertisement
बँकर जोडण्यासाठीही वेळ वाचेल. आधी बँकर लावणे किंवा काढण्यासाठी 15-20 मिनिटे लागत असत, पण नवीन लूप लाइन मुळे मालगाड्यांवर बँकर लगेच लावता येईल. त्यामुळे मुख्य लाइन फक्त प्रवासी गाड्यांसाठी खुली राहील. या सुधारणामुळे लोणावळा स्थानकावरील मालवाहतूक जलद होईल आणि प्रवाशांचा वेळ वाचेल. प्रवास आता अधिक आरामदायक आणि सुरक्षित होईल.
