दोन दिवसांत १४ रेल्वे रद्द
या ब्लॉकमुळे अनेक महत्त्वाच्या आणि रोज धावणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
शनिवारी (७ डिसेंबर) धावणारी पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस आणि पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द राहतील.
रविवार, ८ डिसेंबर रोजी तर तब्बल १२ गाड्यांची अप-डाउन सेवा थांबवण्यात आली आहे. यामध्ये मुंबई-पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस, इंद्रायणी एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन एक्स्प्रेस आणि सिंहगड एक्स्प्रेस या महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
advertisement
विलंबाने धावणाऱ्या गाड्या
याव्यतिरिक्त, अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही या ब्लॉकचा फटका बसणार आहे. ६ आणि ७ डिसेंबर रोजी धावणाऱ्या जोधपूर-हडपसर एक्स्प्रेस, ग्वाल्हेर-दौंड, मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस, मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस, मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस, आणि पनवेल-नांदेड एक्स्प्रेस या गाड्यांना एक ते तीन तास उशीर होण्याची शक्यता आहे.
तसेच, राजकोट-कोईम्बतूर, कुर्ला-चेन्नई, पुणे-जयपूर, आणि पुणे-एर्नाकुलम या गाड्यांनाही सुमारे ४५ मिनिटांचा विलंब होण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी आपल्या गाडीच्या वेळापत्रकाची खात्री करून घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
