मतदान एजंटने यंत्रणा तपासली
मत नक्की कुणाला पडलं पाहण्यासाठी आवश्यक असलेली व्हीव्हीपीएटी (VVPAT) यंत्र यावेळी मशीनसोबत जोडलेली नव्हती. आपली मते योग्य उमेदवारालाच गेली आहेत का, याची पडताळणी करता येत नसल्याने नागरिक संभ्रमात होते. या मुद्द्यावरून मतदारांनी जेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला, तेव्हा त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत. केवळ मतदान एजंटने यंत्रणा तपासली आहे, असे सांगून अधिकाऱ्यांनी हात झटकल्याचा आरोप होत आहे.
advertisement
यंत्र सोबत ठेवण्यास नकार दिला
या प्रकरणात विरोधी पक्षांनी आधीच निवडणूक आयोगाकडे व्हीव्हीपीएटी यंत्रांची मागणी केली होती आणि हा लढा कोर्टापर्यंतही पोहोचला होता. मात्र, आयोगाने कोर्टातही ही मागणी फेटाळून लावत ही यंत्र सोबत ठेवण्यास नकार दिला होता. परिणामी, मतदारांना आपल्या मताची खात्री करून घेण्याची कोणतीही संधी आज उपलब्ध नव्हती. या तांत्रिक वादासोबतच मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असल्याने संपूर्ण परिसरात एक प्रकारचे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
एकूण 5 मतदान केंद्रांवर EVM मशीन बंद
दरम्यान, पुण्यात महात्मा गांधी उर्दू शाळा गुरुवार पेठ प्रभाग क्रमांक 26 या ठिकाणीही दोन ठिकाणी मशीन बंद आहेत. मतदाराची सिक्वेन्स ही चुकलेले दिसले. अ ब क ड नुसार सिक्वेन्स नसल्याचं दिसून आलं. पुण्यात अनेक ठिकाणी मतदानावेळी EVM मशीन बंद पडल्याचं दिसून आलं. एकूण 5 मतदान केंद्रांवर EVM मशीन बंद असल्याचं समोर आलं होतं. प्रभाग क्रमांक २४,२५ ,२६ आणि ३३ मध्ये अनेक मतदान केंद्राच्या बाहेर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
