धानौरीतून सर्वाधिक 95 हरकती
या हरकतींच्या आकडेवारीनुसार, येरवडा कळस धानौरी क्षेत्रीय कार्यालयाकडे सर्वाधिक 95 हरकती दाखल झाल्या आहेत. या उलट, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाकडे अद्यापपर्यंत एकही हरकत दाखल झालेली नाही. या महापालिका निवडणुकीसाठी पुणे शहरातील एकूण मतदारांची संख्या 35 लाख 51 हजार 469 इतकी आहे.
पुण्यात दुबार मतदारांचा आकडा किती?
advertisement
या यादीतील एक महत्त्वाची बाब म्हणजे, यामध्ये दुबार मतदारांचा आकडा ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन हादरेल. दुबार मतदारांची संख्या (Duplicate Voter Names) तब्बल 3 लाख 46 इतकी मोठी आहेत. या दुबार नावांवरून पुढे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. पालिकेच्या एकूण 41 प्रभागांपैकी 10 प्रभागांमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत, ज्यामुळे या प्रभागांमधील स्पर्धा अधिक चुरशीची होईल.
काळजी घेतली जाईल - नवल किशोर राम
दरम्यान, दुबार मतदारांची तारांकित करून दुबार मतदान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, अशी माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या सूचना देखील निवडणूक आयोगाने दिलेल्या होत्या. महापालिकेच्या निवडणूक शाखेने मतदार यादी तयार करण्याचे काम पूर्ण केले असून, प्रारूप मतदार याद्या या गुरुवारी आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आल्या.
