राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुतीतल्या फोडाफोडीवर नाराजी व्यक्त केली आहे.
\ अजित पवारांच्या नाराजीला किनार आहे ती काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं राबवलेल्या ऑपरेशन कमळची होती. पिंपरी चिंचवडमधील अजित पवारांच्या पक्षाचे डझनभर नगरसेवक भाजपनं काही दिवसांपूर्वी आपल्या गळाला लावलेत. महायुतीतील ही फोडाफोडी अजित पवारांच्या जिव्हारी लागली आहे.
भाजपनं अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठं भगदाड पाडलं
advertisement
पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठं भगदाड पाडलं आहे. अजित पवारांच्या शिलेदारांनाचं भाजपनं पक्षात घेत राष्ट्रवादीची राजकीय ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेचं अजित पवारांनी भाजपला गर्भित इशारा दिलाय. तर भाजपनंही अजित पवारांना उत्तर दिलंय..
भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींची मोट बांधण्याचा प्रयत्न
एकीकडे भाजपला थेट भिडण्याची तयारी करत असताना अजित पवार पुण्यात तिरकी चाल खेळण्याच्या तयारीत आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेससोबत मागच्या दाराने दादांनी चर्चा सुरु केल्याचं बोललं जातंय. पुण्यात भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला जातोय. दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे.
पुण्याची निवडणूक अजित पवारांच्या अस्तित्वाची लढाई
पुणे जिल्हा आणि पवार कुटुंब हे अनेक वर्षांचं समीकरण आहे पवारांच्या या बालेकिल्याला सुरुंग
लावण्यासाठी भाजपनं अनेकांना पक्षात घेत ताकद दिली आहे. यामुळं पुणे जिल्ह्यातील महापालिकेची निवडणूक ही अजित पवारांसाठी एकप्रकारे राजकीय अस्तित्वाची लढाई आहे.यामुळं भाजपविरोधातील या लढाईत सर्व त्या पर्यायाची मदत घेण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून केला जात असल्याची चर्चा आहे.
