पुणे महानगर पालिकेमध्ये एका वर्षाच्या करारावर केंद्रीय गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या TULIP या प्रोग्रामच्या अखत्यारित नवीन पदभरती केली जात आहे. अभियांत्रिकी इंटर्न – स्थापत्य (Engineering Intern – Civil), अभियांत्रिकी इंटर्न – विद्युत (Engineering Intern – Electrical), पदवीधर इंटर्न – बी.कॉम (Graduate Intern – B.Com) आणि माळी (Gardener) अशा चार पदांसाठी ही नोकरभरती केली जाणार आहे. एकूण 255 पदांसाठी ही नोकरभरती केली जाणार असून 04 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहेत. अवघे काही दिवसच शिल्लक राहिले असून अर्जदारांनी वेळ न दवडता अर्ज भरायचा आहे.
advertisement
सिव्हिल इंजिनियर पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून BE/B.Tech (Civil) ची पदवी घेतलेली असावी. इलेक्ट्रिकल इंजिनियर पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून BE/B.Tech (Electrical) ची पदवी घेतलेली असावी. पदवीधर इंटर्न – बी.कॉम पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Com ची पदवी घेतलेली असावी. तर, माळी (Gardener) पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण असावा. दरम्यान, इंटर्नशिप ट्रेडची आवश्यक माहिती, इंटर्नशिप उमेदवारी मिळणेबाबत माहिती पत्रक, मार्गदर्शक तत्वे आणि माहिती पुस्तक https://internship.aicte-india.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
https://internship.aicte-india.org/fetch_ubl1.php या वेबसाईटवर जाऊन अर्जदार अर्ज करू शकणार आहेत. वेबसाईटवर आल्यानंतर अर्जदारांना अनेक अर्ज दिसतील. व्यवस्थित पाहून अर्जदारांनी इंटर्नशिपसाठी अर्ज करायचा आहे. दरम्यान, पुणे महानगर पालिकेकडून अर्जदारांना इंटर्न उमेदवारीचा अर्ज फक्त https://internship.aicte-india.org/fetch_ubl1.php या संकेतस्थळावरूनच करावा. इतर कोणत्याही मार्गाने आलेले अर्ज रद्द करण्यात येतील, अशी माहिती सुद्धा देण्यात आली आहे. सिव्हिल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि पदवीधर इंटर्न – बी.कॉम पदासाठी 15,000 रूपये इतके मासिक मानधन देण्यात येणार आहे. तर, माळी (Gardener) पदासाठी अर्जदारांना 6,000 रूपये इतके मासिक मानधन देण्यात येणार आहे.
