मतदानासाठी पीएमपीएमएलचा वापर
पुण्यात पंधरा जानेवारी रोजी महापालिका निवडणूक होणार आहे. मतदानासाठी तयारी म्हणून प्रशासनाने पीएमपीएमएलच्या बसेसचा वापर करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मतपेट्या आणि निवडणूक साहित्य पोहचवण्यासाठी 1056 बसेस निवडल्या गेल्या आहेत.
यामुळे 14 आणि 15 जानेवारीला पुण्यात काही मार्गांवर बस कमी प्रमाणात उपलब्ध असतील. प्रवाशांना बस उशिरा येणे किंवा फेऱ्या कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीएमपीएमएलचा दररोजचा प्रवास थोडा त्रासदायक होऊ शकतो.
advertisement
मुख्य प्रवासी म्हणजे विद्यार्थी, नोकरदार, महिला आणि ज्येष्ठ नागरिक हे आहेत. प्रशासनाने नागरिकांना विनंती केली आहे की, प्रवासाचे नियोजन आधीपासून करा. शक्य असल्यास पर्यायी बस किंवा दुसरे वाहन वापरा. गर्दी टाळण्यासाठी लवकर निघा किंवा प्रवासासाठी वेगळा वेळ ठरवा.
या निर्णयामुळे मतदान प्रक्रियेस सुरळीत पार पडेल आणि मतपेट्या वेळेत पोहचवता येतील. प्रवाशांना काही गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने आधीच सूचना दिल्या आहेत.
