TRENDING:

Pune Ahilyanagar Railway: पुणे-नाशिक रेल्वेचा मार्ग बदलला, संगमनेर वगळलं, अहिल्यानगरबाबत महत्त्वाचं अपडेट

Last Updated:

Pune Ahilyanagar Railway: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलण्यात आला आहे. तसचे पुणे ते अहिल्यानगर मार्गाबाबत मोठा निर्णय झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पात मोठा बदल करण्यात आला आहे. यानुसार पुणे ते अहिल्यानगर साधारण 133 किमी अंतरासाठी नवीन दुहेरी मार्गाची योजना तयार करण्यात आली आहे. नवीन अलायन्मेंटनुसार, पुणे–अहिल्यानगर मार्गात बदल करण्यात आला असून, मूळ मार्गाऐवजी आता रेल्वे ट्रॅक पुणे–चाकण औद्योगिक वसाहत–अहिल्यानगर–निंबाळक–पिंपळगाव–साईनगर–शिर्डी–नाशिक असा मार्ग करण्यात येणार आहे.
Pune Ahilyanagar Railway: पुणे-नाशिक रेल्वेचा मार्ग बदलला, नवा प्लॅन ठरला, अहिल्यानगरबाबत महत्त्वाचं अपडेट
Pune Ahilyanagar Railway: पुणे-नाशिक रेल्वेचा मार्ग बदलला, नवा प्लॅन ठरला, अहिल्यानगरबाबत महत्त्वाचं अपडेट
advertisement

रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पासाठी 8,970 कोटी रुपयांचे डीपीआर तयार करण्यात आले आहे. नवीन मार्गामुळे चाकण औद्योगिक वसाहत थेट रेल्वे मार्गाशी जोडली जाणार आहे. स्थानिक प्रशासन आणि तज्ज्ञांच्या चर्चेनंतर हा प्रस्ताव जीएमआरटी या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाद्वारे तयार करण्यात आला आहे. या बदलामुळे उद्योग क्षेत्रातील मालवाहतूक जलद आणि सुरळीत होईल, तसेच प्रवासाचा वेळ देखील मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.

advertisement

'तुझ्या घरचं खातो का? वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालणं पुण्याच्या तरुणाला भोवलं, आता हात जोडून म्हणतोय...

मार्गात बदल करण्यामागचं कारण काय?

रेल्वे मार्ग जीएमआरटी या आंतरराष्ट्रीय खगोल-निरीक्षण केंद्राच्या परिसरातून जाणार असल्याने विज्ञान-तंत्रज्ञान विभाग आणि अणुऊर्जा विभागाने त्यावर आक्षेप नोंदवला होता. रेल्वे लाइनमुळे दुर्बिणीची निरीक्षण प्रक्रिया बाधित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने या प्रकल्पासाठी नवीन पर्यायी मार्गाचा आराखडा तयार करण्यात आला. या बदलामुळे पुणे–नाशिक तसेच पुणे–अहिल्यानगर या मार्गांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे कनेक्टिव्हिटीत मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहे.

advertisement

संगमनेर वगळलं

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मार्गशिष महिन्यात देवीच्या नैवद्यासाठी खास, बनवा केळीची पुरी, रेसिपीचा Video
सर्व पहा

पुणे आणि नाशिक हा मार्ग आता शिर्डी आणि अहमदनगर मार्गे जाणार आहे. यामुळे अनेक वर्षांपासून या मार्गावर असणारे संगमनेर शहर वगळण्यात आले आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

मराठी बातम्या/पुणे/
Pune Ahilyanagar Railway: पुणे-नाशिक रेल्वेचा मार्ग बदलला, संगमनेर वगळलं, अहिल्यानगरबाबत महत्त्वाचं अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल