नेमकी घटना काय?
सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्या संगीता विश्वनाथ वरघडे (वय ६५) या महिला भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. काही दिवसांपूर्वी त्या दांडेकर पुलाजवळील चारभुजा दुकानापाशी उभ्या असताना, आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधला. "आम्ही सोन्या-चांदीचे दागिने पॉलिश करून चकाकी आणून देतो," असे सांगून त्यांनी संगीता यांचा विश्वास संपादन केला. पॉलिश करण्याच्या प्रक्रियेदरम्यान चोरट्यांनी अत्यंत शिताफीने हातचलाखी केली आणि संगीता यांच्या हातातील २० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या लंपास केल्या.
advertisement
पोलिसांची कारवाई आणि मुद्देमाल जप्त: फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वरघडे यांनी पर्वती पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत परराज्यातील या टोळीला बेड्या ठोकल्या. अटक केलेल्या आरोपींकडून चोरीचे २० ग्रॅम सोने आणि दागिने पॉलिश करण्यासाठी वापरले जाणारे रासायनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी गुरुवारी (८ जानेवारी) प्रसिद्धीपत्रकाद्वारे या कारवाईची माहिती दिली.
नदीवरील पुलाच्या कठड्यावर उभी होती महिला; उडी मारणार इतक्यात 'देवदूत' आले धावून अन्...
सध्या शहरात दागिने स्वच्छ करण्याच्या बहाण्याने लूट करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. त्यामुळे अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवून आपले दागिने त्यांच्या स्वाधीन करू नका, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
