Pune News : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका तरूणाचा एका खोलीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रवींद्र बबन जाधव (27) असे या तरूणाचे नाव आहे. हा तरुण मुळचा इंदापूरचा रहिवासी आहे. आणि तो नुकताच पुणे शहर पोलिसात नवीन भरती झाला होता. या दरम्यान तो आपल्या मित्रांसोबत पु्ण्यात खोलीत राहायचा. याच खोलीत आता त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने आता पुण्यात खळबळ माजली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मृत रवींद्र जाधव हा मुळचा इंदापूर होता, तो गलांडवाडी न. 1 येथे राहायचा. आणि नुकताच तो पुणे शहर पोलिसात नवीन भरती झाला होता. त्यामुळे सोलापूर येथे ट्रेनिंगसाठी जाणार होता.तसेच तो पोलीस झाला असला तरी स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न होता. यासाठी तो पुण्यात आपल्या मित्रांसोबत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास ही करीत होता.
दरम्यान दिवाळी असल्याने रवींद्र जाधव याचे सगळे मित्र आपआपल्या गावी निघून गेले होते. रवींद्र जाधव एकटात पुण्यातील 127 बी बुधवार पेठ, सीताराम स्मृती बिल्डिंग,दुसरा मजला. जोगेश्वरी मंदिरा जवळ असणाऱ्या खोलीत राहत होता. या दरम्यान आज खोलीत रवींद्र बबन जाधव हा तरूण बेशुद्ध असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता रवींद्र जाधव याचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. प्राथमिक माहितीनूसार पेस्ट कंट्रोलमुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. या घटनेने खळबळ माजली आहे
त्याचं झालं असं की रवींद्र जाधवसोबत खोलीवर राहत असणारे त्याचे मित्र हे दिवाळी सुट्टी असल्याने गावी गेले होते. जाताना संपूर्ण खोली ( पेस्टिसाइड) पेस्ट कंट्रोल केली होती. तसे घटनास्थळीही दिसून आले. मात्र रवींद्र हा त्याच खोलीत झोपल्याने ( पेस्टिसाईडच्या ) पेस्ट कंट्रोलच्या विषबाधेच्या प्रभावामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
रवींद्र बबन जाधव हा शेतकरी कुटुंबातून आहे. अत्यंत खडतर परस्थिती मधून पोलिस भरती झाला होता. पुणे शहराच्या पोलिस भरतीतील सर्वात टॉपर कॅंडिडेट म्हणून निवड झाली होती. खरे तर त्याला स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न होते. दरम्यान तो पोलिस भरती झाला. तरी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीतच होता. तो विविध पोलिस भरतीच्या अकॅडमी मध्ये भरती सराव करणाऱ्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी ही जात होता.
गावातील तरुणाना सोबत घेऊन गड किल्ले सर करण्याचा त्याला छंद होता. तरुणांमध्ये अत्यंत प्रिय होता. त्याच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्याच्या पाठीमागे भाऊ, भाऊजय विवाहित बहीण आणि आई असा परिवार आहे. त्याच्यावर काल रात्री पॉलिस इंतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या या अकस्मित निधनाने संपूर्ण गावाभर आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.