मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी एमआयडीसीमधील गणेश प्रेसिंग कंपनी ही रिमोट कंट्रोलच्या मदतीने वीज चोरी करत असल्याचा माहिती महावितरणाला मिळाली होती. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी वीज वितरण हाणी कमी करण्याबाबत श्रेत्रिय अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते.त्यानुसार महावितरण पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी वीजचोरी विरोधात मोहिम तीव्र करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
advertisement
गणेशखिंड मंडलाचे अधिक्षत अभियंता सिंहाजीराव गायकवाड व भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल देवकर यांनी खास पथक तयार केले होते. या पथकात अतिरीक्त कार्यकारी अभियंता यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक अभियंता गजानन झापे, वीज कर्मचारी हर्षद लोखंडे, सोमनाथ गायकवाड, महेश वाघमारे यांनी भोसरी एमआयडीसीमध्ये तपासणी सूरू केली.
या तपासणीत गणेश प्रेसिंग या कंपनीकडून 77,270 युनिट्सची वीजचोरी झाल्याचं समोर आलं होतं. गेल्या दोन वर्षांपासून ही कंपनी रिमोट कंट्रोलच्या मदतीने वीजचोरी करत होती. या कंपनीने तब्बल 19 लाखांची वीजचोरी करत असल्याचे महावितरणने उघड केली होते.
महावितरणने या ग्राहकाकडून चोरी केलेल्या विजेची रक्कम म्हणून 19 लाख 19 हजार 362 आणि तडजोड शुल्क म्हणून 2 लाख 30 हजार असा एकूण दंड वसूल केला आहे.तसेच कंपनीकडून औद्योगिक ग्राहकाकडून वीजचोरीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे.या कारवाईमुळे वीजचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.