व्हिडिओ पाहिला असता खूर्च्यांची फेका फेक सूरू आहे. ही फेकाफेक इतकी जोरात सूरू आहे की खूर्च्या तुटल्या आहेत. तसेच या घटनेत एका व्यक्तीला टार्गेट करून त्याच्या डोक्यावर सतत खूर्च्या मारल्या आहेत. ज्यामुळे त्या व्यक्तीचे डोकं फुटलं होतं आणि तो रक्तबंबाळ झाला होता. या राड्याच्या काही मिनिटांनी घटनास्थळी पोलीस दाखल होतात आणि पिडीताला रूग्णालयात दाखल करतात तर आरोपींनाही घटनास्थळावरून अटक करतात असे संपूर्ण कॅमेरात कैद झाले आहे.
advertisement
खरं तर डेक्कन चौपाटी ही नदीपात्र परिसरामध्ये आहे. त्यामुळे रात्री उशिरा पर्यंत येथे पार्टी सूरू असते. रविवारी मध्यरात्री अशीच पार्टी सूरू होती.या पार्टी दरम्यान चौपाटीवर दारू पिण्यावरून दोन गटात तुफान राडा झाला होता. या राड्यातून दोन्ही गटांनी एकमेकांना खूर्च्या फेकून मारहाण करण्यात आली होती.यामध्ये एकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली होती.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.यावेळी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तरूणांना ताब्यात घेतलं होतं. त्याचसोबत पीडीत व्यक्तीला उपचाराखातर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.या प्रकरणात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन जणांना केली अटक आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.