पोलिसांनी शिकवला चांगलाच धडा
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही तरुणांनी मित्रांच्या वाढदिवसाच्या पार्टीनंतर रस्त्यावरच गाडी उभी करून मोठ्या आवाजात गाणी लावली, आरडाओरडा करत नाचगाणं सुरू केलं. काहींनी दारूच्या बाटल्या रस्त्यावर फेकून गोंधळ घातला. या प्रकारामुळे नागरिकांना त्रास झाला. याबाबत स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर काही वेळातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
advertisement
पोलिसांनी ताबडतोब या तरुणांना आवरलं, त्यांच्याकडून दारूच्या बाटल्या आणि गाडी जप्त केली. संबंधितांवर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाहनतळ नियमभंगाबाबतही कारवाई सुरू आहे. पोलिसांनी या तरुणांना चौकीत नेऊन समज दिल्यानंतर त्यांच्याकडून माफीनामा देखील घेतला असल्याचे समजते.https://www.instagram.com/reel/DP7qVrjEhBs/?igsh=dzZ6cm8wYXNuZG53
या संपूर्ण कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे. रात्री अशा प्रकारचे उपद्रव करणाऱ्यांवर कारवाई झाल्याने आता थोडासा दिलासा मिळाला आहे,असे नागरिकांनी सांगितले. सोशल मीडियावरही या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल झाले असून, अनेकांनी पुणे पोलिसांचे कौतुक केले.
पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन उपद्रव केल्यास कठोर कारवाई केली जाईल. शहरातील शिस्त आणि शांतता राखण्यासाठी अशा मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.