पेट्रोल पंप संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच चालू
गेल्या काही पुण्यात कर्मचाऱ्यांना मारामारीचा प्रकार वाढला आहे. पुण्यातील भैरोबानाला, पुलगेट आणि येरवडा येथील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने मोठा निर्णय घेतला अन् पुण्यातील पेट्रोल पंप संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच चालू राहणार असल्याचं जाहीर केलं आहे.
advertisement
सात दिवसात तीन घटना
पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर पुण्यात गेल्या काही दिवसातून हल्ले होते आहेत. याच्या निषेधार्थ आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी निर्णय घेतला गेल्याची माहिती देण्यात आली आहे. पुण्यात सात दिवसात कर्मचाऱ्यावर तीन हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता पुणेकरांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशन यांनी पुण्याचे कमिशनर अमितेश कुमार यांना विनंती करून पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. संरक्षण मिळालं तरच पेट्रोल पंप चालू ठेऊ अन्यथा पेट्रोल पंपावर एकही थेंब पेट्रोल मिळणार नाही, असं पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने सांगितलं आहे.
